CWG 2026: राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा डंका! 96 वर्षानंतर पहिल्यांदाच असं घडलं, बॉक्सर्सने रचला इतिहास

आज 2026 मध्ये भारतीय बॉक्सर्सनी यशाचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

कॉमन वेल्थ गेम्समध्ये भारतीय बॉक्सर्सने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी अशा कामगिरीची नोंद केली आहे जी 96 वर्षांत पहिल्यांदाच झाली आहे. त्यामुळे भारतीय बॉक्सर्सचं विशेष कौतूक होत आहे.  ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय बॉक्सर्सनी सुवर्णपदकांचा वर्षाव केला आहे. ही कामगिरी सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिली गेली आहे. स्पर्धेत नेमबाजी, बॅडमिंटन आणि कुस्ती या खेळांचा समावेश नाही.  त्यामुळे भारताच्या पदकसंख्येत घट होईल, अशी भीती क्रीडा तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात होती. मात्र हा सर्वांचाच अंदाज चुकला आहे. 

बॉक्सिंग, ज्युडो, वेटलिफ्टिंग आणि अ‍ॅथलेटिक्समधील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे स्पर्धेता भारताचे स्थान उंचावले आहे. 96 वर्षांच्या राष्ट्रकुल इतिहासात पहिल्यांदाच भारतीय बॉक्सर्सनी 7 सुवर्ण आणि 3 रौप्य अशी तब्बल 10 पदके जिंकण्याची अभूतपूर्व कामगिरी केली आहे. यात महिला बॉक्सर्सचा मोठा वाटा आहे.  भारतीय महिला बॉक्सर्सनी रिंगमध्ये पूर्ण वर्चस्व गाजवत 5 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक पटकावले. प्रीती पवार, जॅस्मिन, साक्षी, प्रिया घंघास आणि अरुंधती चौधरी यांनी प्रतिस्पर्ध्यांना नमवत सुवर्णपदकांवर नाव कोरले आहे. तर ऑलिम्पिक पदक विजेती लव्हलिना बोरगोहेनने प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळवले.

Advertisement

नक्की वाचा - Who Is Sharmila Dhankhar: हुंड्यासाठी अमानुष छळ, मोलकरीण म्हणून राबली, तिनेच देशासाठी 'गोल्ड मेडलं' जिंकलं

भारतीय पुरूष बॉक्सर्सने ही चांगली कामगिरी करत सर्वांनाच चकीत केले आहे.  पुरुष विभागात भारताने 2 सुवर्ण पदकं जिंकली आहे. शिवाय  2 रौप्यपदकांवर ही आपलं नाव कोरलं आहे. सचिन आणि अंकुश यांनी सुवर्ण पंच मारला आहे. तर जादुमणी आणि नरेंद्र यांनी रौप्यपदक जिंकले आहे. हरियाणाच्या नरेंद्रने 90+ किलो वजनी गटात भारतासाठी 10 वे पदक निश्चित केले आहे.

नक्की वाचा - CWG 2026 : तिने पुन्हा जिंकलं; गोल्डन हॅट्रिक पूर्ण, मीराबाई चानूने रचला इतिहास

या 10 पदकांच्या जोरावर भारताने स्पर्धेचा शेवटचा दिवस शिल्लक असताना 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 8 कांस्य अशा एकूण 38 पदकांची कमाई केली आहे. शिवाय पदकतालिकेत चौथे स्थान पटकावले आहे. 1934 मध्ये राष्ट्रकुलमध्ये पदार्पण करणाऱ्या भारताला बॉक्सिंगमधील पहिले पदक मिळवण्यासाठी 1998 पर्यंत वाट पाहावी लागली होती. 2002 मध्ये मोहम्मद अली कमरने पहिले सुवर्ण जिंकले होते. त्यानंतर 2026 च्या या स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सनी आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे.