CWG 2026 : भारताची स्टार ओलंम्पिक पदक विजेती मीराबाई चानू यांनी पुन्हा एकदा भारतीयांची मनं जिंकली आहेत. कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये मीराबाईने महिला ४८ किलोग्रॅम गटात जबरदस्त कामगिरी केली. त्यांच्या दमदार खेळामुळे भारताने पुन्हा एकदा गोल्ड मेडल जिंकलं आहे. या यशासह मीराबाई चानूने या खेळात सातत्याने तीन गोल्ड मेडल जिंकून आपली गोल्डन हॅट्रिक पूर्ण केली आहे. म्हणजे सलग तिसऱ्यांदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे राष्ट्रगीतच निनादले आहे.
मीराबाई चानूने रचला इतिहास...
महिलांच्या ४८ किलो वजनी गटात, मीराबाई चानूने ८५ किलो वजन उचलून विक्रमांच्या यादीत आपलं नाव कोरलं आहे. मीराबाईने तिसऱ्या प्रयत्न सहजपणे ८५ किलोग्रॅम वजन उचललं आणि एक नवा कॉमनवेल्थ रेकॉर्ड विक्रम प्रस्थापित केला. सुरुवातीला त्यांनी ८२ किलोग्रॅम वजन उचलून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नवा रेकॉर्ड केला आणि ८५ किलो वजन उचलत नवा कॉमनवेल्थ रेकॉर्ड केला आहे.
Calm. Composed. Record-breaking. 🏋️♂️
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 26, 2026
Mirabai Chanu lifts 85 kg to set a new Commonwealth Games snatch record 🙌
Watch the Commonwealth Games LIVE NOW exclusively on Sony Sports Network TV channels and Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV #Glasgow2026 #GlasgowMeinTiranga… pic.twitter.com/iMrBXx3Sv1
जबरदस्त करिश्मा...
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही खेळाडूकडून उचलण्यात आलेलं सर्वात जास्त वजन आहे. हे केवळ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी सीमित नाही तर जगातील कोणत्याही प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धेत (उदा. वर्ल्ड चॅम्पियनशिप, ऑलिम्पिक आदी) राष्ट्रकुल देशांतील कोणत्याही खेळाडूने मिळवलेला हा सर्वोच्च स्कोअर आहे.
राष्ट्रमंडळ क्रीडा स्पर्धेत (CWG) मीराबाई चानू यांची कामगिरी
रौप्यपदक – २०१४ ग्लासगो ४८ किलो
सुवर्णपदक – २०१८ गोल्ड कोस्ट ४८ किलो
सुवर्णपदक – २०२२ बर्मिंगहॅम ४९ किलो
सुवर्णपदक – २०२६ ग्लासगो ४८ किलो
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world