ENG vs IND : 'आयसीसीने याकडे लक्ष देण्याची गरज', लॉर्ड्स टेस्टमधील अंपायरवर अश्विन संतापला

ENG vs IND : लॉर्ड्स टेस्टमध्ये टीम इंडियाच्या पराभवाबरोबरच खराब अंपायरिंगचीही चर्चा चांगलीच झाली.

जाहिरात
Read Time: 2 mins
ENG vs IND : लॉर्ड्स टेस्टमधील अंपायरच्या निर्णयावर अश्विननं नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई:

ENG vs IND : लॉर्ड्स टेस्टमध्ये टीम इंडियाच्या प्रमुख बॅटरनं खराब कामगिरी केली. त्यांच्या खराब कामगिरीमुळे भारतीय टीमला 193 रन्सचं सोपं लक्ष्य पूर्ण करता आलं नाही. टीम इंडियाच्या पराभवाप्रमाणेच खराब अंपायरिंगची देखील या मॅचमध्ये चर्चा झाली. विशेषत: अंपायर पॉल रायफेलचा निर्णय वादग्रस्त ठरला. टीम इंडियाचा महान बॉलर आर. अश्विननंही रायफेल यांच्या निर्णयावर टीका केली आहे. 

काय घडलं कारण?

लॉर्ड्स टेस्टच्या चौथ्या दिवशी एकूण 14 विकेट्स पडल्या. त्यामधील इंग्लंडचा दिग्गज बॅटर जो रुटबाबत दिलेल्या निर्णयावर अश्विननं टीका केली. चौथ्या दिवशी मोहम्मद सिराजच्या बॉलवर जो रुट विरुद्धचं एलबीडब्ल्यू अपील रायफेलनं फेटाळलं. पण, नंतर डीआरएस (DRS) अपीलमध्ये स्पष्टपणे दिसले की, चेंडू स्टंपला लागला असता. तरीही, रायफेलच्या निर्णयामुळे रूटला 'जीवनदान' मिळाले. रायफेलच्या या निर्णयामुळे अश्विन चांगलाच नाराज होता. 

Advertisement

अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले, "माझा रायफेलसोबतचा अनुभव असा आहे की, मला त्यांच्याशी बोलायचे आहे. मी असे म्हणत नाही की, 'तुम्ही त्याला आऊट द्या.' तसे काही नाही. मुद्दा हा आहे की, जेव्हा जेव्हा भारत बॉलिंग करतो, तेव्हा रायफेलला नेहमीच वाटते की हा 'नॉटआउट' आहे." तो पुढे म्हणाला, "हे फक्त भारतासोबतच नाही, तर सर्व टीमविरुद्ध असेच होते. आयसीसीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे." अश्विनने आपल्या मताला बळकटी देण्यासाठी भारतीय कर्णधार गिलच्या निर्णयाव्यतिरिक्त आणखी एका भारतीय फलं उदाहरण दिले. त्यानुसार, राफेलने तेव्हा फलंदाजाला आऊट दिले होते, जेव्हा बॅट आणि बॉलमध्ये खूप जास्त अंतर होते.

Advertisement

( नक्की वाचा: Ravindra Jadeja Records : लॉर्ड्सवर रविंद्र जडेजाची दमदार खेळी; 'हे' विक्रम केले नावे )
 

अश्विनने उपहासाने म्हटले, "माझ्याकडे सेडान कार आहे. आणि मी ती बॅट आणि चेंडूच्या मधल्या मोकळ्या जागेत पार्क करू शकेन. हे स्पष्ट होते की तो आऊट नव्हता, पण असे पहिल्यांदाच घडले नाही. माझे वडील माझ्यासोबत सामना पाहत होते. आणि ते मला म्हणाले, 'जेव्हा कधी रायफेल येतो, तेव्हा भारत मॅच जिंकत नाही.' इंग्लंडचा माजी कॅप्टन नासिर हुसेन आणि माईक अथर्टन यांनीही कॉमेंट्रीदरम्यान रायफेलवर नाराजी व्यक्त केली."
 

Advertisement
Topics mentioned in this article