जाहिरात

Ravindra Jadeja Records : लॉर्ड्सवर रविंद्र जाडेजाची दमदार खेळी; 'हे' विक्रम केले नावे

Ravindra Jadeja Records : रवींद्र जडेजा तिन्ही फॉरमॅटमध्ये ७००० धावा पूर्ण केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्याकडे ६११ विकेट्स देखील आहेत. ६०० विकेट्स घेणारा आणि ७००० धावा करणारा जडेजा दुसरा भारतीय खेळाडू ठरला.

Ravindra Jadeja Records : लॉर्ड्सवर रविंद्र जाडेजाची दमदार खेळी; 'हे' विक्रम केले नावे

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात लॉर्ड्सवर भारताचा २२ धावांनी पराभव झाला. अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाची एकाकी झुंज व्यर्थ गेली. या विजयानंतर इंग्लंडने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. मात्र रविंद्र जाडेजाने या सामन्यात अनेक विक्रम आपल्या नावे केले.  रवींद्र जाडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७००० धावा आणि ६०० विकेट घेण्याचा विक्रम केला.

इंग्लंडमध्ये सलग चार अर्धशतके

इंग्लंडमध्ये सलग चार अर्धशतके झळकावणारा जाडेजा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी फक्त ऋषभ पंत आणि सौरव गांगुली हे करू शकले. तिसऱ्या कसोटी सामन्यात तो ६१ धावांवर नाबाद राहिला. त्याआधी पहिल्या डावातही त्याने अर्धशतक (72 धावा) झळकावले होते. तर दुसऱ्या सामन्यातील दोन्ही डावात जाडेजाने अर्धशतक जळकावले होते.  

(नक्की वाचा- Ind vs Eng: भारताचा लॉर्ड्स टेस्टमध्ये पराभव, जाडेजाची एकाकी झुंज अपयशी, इंग्लंडची मालिकेत आघाडी)

लॉर्ड्सवर सलग दोन अर्धशतके

लॉर्ड्सवर दोन अर्धशतके झळकावणार जाडेजा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी १९५२ मध्ये, विनू मंकडने पहिल्या डावात ७२ आणि दुसऱ्या डावात १८४ धावा केल्या होत्या. या २ व्यतिरिक्त, लॉर्ड्स कसोटीच्या दोन्ही डावात कोणताही भारतीय ५० पेक्षा जास्त धावा करू शकला नाही.

७००० धावा आणि ६०० विकेट्स

रवींद्र जडेजा तिन्ही फॉरमॅटमध्ये ७००० धावा पूर्ण केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्याकडे ६११ विकेट्स देखील आहेत. ६०० विकेट्स घेणारा आणि ७००० धावा करणारा जडेजा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. त्याच्या आधी फक्त माजी कर्णधार कपिल देव यांनी ही कामगिरी केली आहे. कपिल देवे यांच्या नावावर ६८७ विकेट्स आणि ९०३१ धावा आहेत.

(नक्की वाचा- IND vs ENG: शुबमन गिल अंपायरवर चिडला, गावस्करही संतापले! लॉर्ड्स टेस्टमध्ये भर मैदानात मोठा राडा)

सामन्या काय घडलं?

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने पहिल्या डावात ३८७ धावा केल्या. भारताकडून पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने पाच विकेट घेतल्या. भारताने देखील पहिल्या डावात ३८७ धावा केल्या. यात केएल राहुलच्या शतकाचा समावेश होता. दुसऱ्या डावात भारताने इंग्लंडला अवघ्या १९३ धावांर रोखलं. मात्र इंग्लंडच्या आक्रमक खेळीसमोर भारताचा डाव 170 धावात आटोपला. इंग्लंडचा 22 धावांनी विजय झाला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com