IND vs ENG : ओव्हल टेस्टपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का, बेन स्टोक्स बाहेर! हा खेळाडू करणार नेतृत्त्व

Ben Stokes Ruled Out From Fifth Test vs India: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवी टेस्ट ओव्हलवर गुरुवारपासून (31 जुलै) सुरु होत आहे. या टेस्टपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसलाय.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ben Stokes : बेन स्टोक्सची अनुपस्थिती इंग्लंडसाठी मोठा धक्का आहे.
मुंबई:


Ben Stokes Ruled Out From Fifth Test vs India: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवी टेस्ट ओव्हलवर गुरुवारपासून (31 जुलै) सुरु होत आहे. या टेस्टपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसलाय. इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कॅप्टन बेन स्टोक्स ही टेस्ट खेळू शकणार नाही. स्टोक्सच्या उजव्या खांद्याला दुखापत झालीय. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डानं (ECB) ही माहिती दिली आहे. 

बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीमध्ये व्हाईस कॅप्टन ओली पोप टीमचं नेतृत्त्व करेल. पाच टेस्टच्या सीरिजमध्ये इंग्लंड सध्या 2-1 नं आघाडीवर आहे. 

बेन स्टोक्सनं यापूर्वी झालेल्या मँचेस्टर टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावली होती. तसंच त्यानं या सीरिजमध्ये आत्तापर्यंत 17 विकेट्स घेतल्या होत्या. बेन स्टोक्सची अनुपस्थिती इंग्लंडसाठी मोठा धक्का मानला जातोय. बेन स्टोक्ससह फास्ट बॉलर जोफ्रा आर्चरही ओव्हल टेस्ट खेळणार नाही. चार वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर टेस्ट क्रिकेटमध्ये परतलेल्या आर्चरला विश्रांती देण्यात आली आहे. त्याचबरोबर फास्ट बॉलर ब्रायडन कार्स देखील शेवटची टेस्ट खेळणार नाही. 

इंग्लंडचा स्पिनर लियाम डॉसन देखील शेवटच्या टेस्टमधून आऊट झालाय. इंग्लिश टीममध्ये जॅकेब बेथेलचा समावेश करण्यात आलाय. तो सहाव्या क्रमांकावर बॅटिंग करेल. त्याचबरोबर सरेचा फास्ट बॉलर  गस ॲटकिन्सन आणि जेमी ओव्हरटन यांच्यासह नॉटिंगहॅमशायरचा फास्ट बॉलर जोश टंगचाही टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. 

( नक्की वाचा : IND vs ENG : हॅरी ब्रुकला बॉलिंग देण्याचा रडीचा डाव का खेळला? बेन स्टोक्सनं सांगितलं कारण )
 

इंग्लंडची प्लेईंग XI : झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप (कॅप्टन), जो रुट, हॅरी ब्रुक, जॅकेब बेथेल, जेमी स्मिथ (विकेट किपर), ख्रिस वोक्स, गस ॲटकिन्सन,  जेमी ओव्हरटन आणि जोश टंग

Advertisement
Topics mentioned in this article