जाहिरात

Euro 2024 : युरो गाजवणारा Lamine Yamal 90 मिनिटं का खेळत नाही? कायद्याचा आहे अडथळा

Euro 2024 : युरो कपमध्ये सर्वाधिक चर्चेत असेलेल्या लामिन यमालला (Lamine Yamal) कधीही संपूर्ण 90 मिनिटं खेळवलं जात नाही.

Euro 2024 : युरो गाजवणारा Lamine Yamal 90 मिनिटं का खेळत नाही? कायद्याचा आहे अडथळा
Lamine Yamal @AFP
मुंबई:

Euro 2024 : युरो 2024 ची फायनल स्पेन विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणार आहे. फुटबॉल विश्वातील या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये स्पेननं फ्रान्सचा तर इंग्लंडनं नेदरलँड्सचा पराभव केला. स्पेननं 2012 नंतर पहिल्यांदाच या स्पर्धेची फायनल गाठलीय. स्पेनच्या सेमी फायनलमधील यशात 16 वर्षांच्या लामिन यमाल (Lamine Yamal) महत्त्वाचा वाटा आहे. त्यानं फ्रान्स विरुद्ध ऐतिहासिक गोल करत स्पेनला फायनल गाठून दिली. 

स्पेनचा नवा सुपस्टार असलेला लामिन फक्त 16 वर्षांचा आहे. तो शनिवारी 17 वा वाढदिवस साजरा करणार आहे. या वाढदिवसापूर्वीच त्यानं अनेक ऐतिहासिक रेकॉर्ड केले आहेत. यमल स्पेनसह एफसी-बार्सिलोना क्लबकडून गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू आहे. इतकंच नाही तर फ्रान्स विरुद्ध सेमी फायनलमध्ये गोल करत युरो कपच्या इतिहासात सर्वात कमी वयात गोल करणारा खेळाडू बनलाय. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

यमालला केलं जातं सबस्टिट्यूट

युरो कपमध्ये सर्वाधिक चर्चेत असेलेल्या यमालला कधीही संपूर्ण 90 मिनिटं खेळवलं जात नाही. मॅच संपण्यापूर्वी त्याच्या बदल्यात राखीव खेळडू उतरवला जातो. यमालला मॅच संपण्यापूर्वीच बेंचवर बसवण्याचं कारण त्याचा खेळ नाही. तर जर्मनीतील कायदा आहे. 

जर्मनीतील लेबर लॉ नुसार 18 वर्षांपेक्षा लहान कोणत्याही व्यक्तीला रात्री 8 नंतर काम करता येत नाही. अ‍ॅथलिट्ससाठी या कायद्यामध्ये थोडी सवलत आहे. त्यांना रात्री 11 पर्यंत काम करण्याची परवानगी आहे. यमाल रात्री 11 नंतरही खेळला तर त्याला 30 हजार युरो म्हणजेच जवळपास 27 लाखांचा दंड भरावा लागेल.

( नक्की वाचा : द्रविडनं विजेतेपद मिळवून दिलं, नवा हेड कोच गंभीरसमोर आहेत 5 मोठी आव्हानं )

फुटबॉल विश्वात सर्वांना प्रभावित करत असलेला लामिन यमाल रिकाम्या वेळात अभ्यासही करतोय. तो जवळपास गेल्या दहा वर्षांपासून बार्सिलोनाच्या प्रसिद्ध अकादमी ला मासियामध्ये राहतोय. घरापासून दूर राहत असल्यानं आई-वडिलांची खूप आठवण येत असल्याचं तो सांगतो. त्याचबरोबर तो मॅचपूर्वी त्याच्या आईशी फोनवर बोलतो.

तुला वाढदिवसाला काय भेट हवीय असा प्रश्न यमालच्या आईनं त्याला विचारला होता. त्यावर माझी टीम जिंकली तर काहीही गिफ्ट देण्याची गरज नाही, असं यमाललं सांगितलं. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com