Unheard Story of MS Dhoni: महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) जागतिक क्रिकेटमध्ये 'कॅप्टन कुल' अशी ओळख आहे. मॅचची परिस्थिती काहीही असो मनाचं संतुलन न गमावता शांतपणे परिस्थिती हाताळणे ही धोनीची खासियत आहे. धोनीच्या या खास वैशिष्ट्याचं दर्शन क्रिकेट फॅन्सना अनेकदा झालं आहे. त्याच्या लोकप्रियेतेमध्ये वाढ करणारा हा एक्स फॅक्टर आहे. त्यामुळे धोनी काही कारणामुळे मैदानावर संतापला तर ती अतिशय विशेष गोष्ट ठरते. भारताच्या अनुभवी बॉलरनं धोनीचा हा राग मैदानात अनुभवला आहे. टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) या दोन्ही टीममध्ये धोनीच्या नेतृत्त्वामध्ये खेळलेल्या या खेळाडूला भर मैदानात धोनीचा राग सहन करावा लागला होता. त्यानं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये 'ती' आठवण सांगितली आहे.
का संतपाला होता धोनी?
चेन्नई सुपर किंग्स टीमचा चार वर्ष सदस्य असलेला भारतीय फास्ट बॉलर मोहित शर्मानं CricTracker ला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला आहे. त्यावेळी धोनीनं त्याला भर मैदानात "शिवीगाळ" सुद्धा केली होती.
मोहितनं सांगितलं की, 'चॅम्पियन्स लीग T20 (CLT20) च्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध, 'माही भाई'ने ईश्वर पांडेला गोलंदाजी करायला बोलावले होते, पण मला वाटले की त्यांनी मला बोलावले.
( नक्की वाचा : Irfan Pathan : 'मी हुक्का लावणारा नाही...': इरफान पठाणचा MS Dhoni वर गंभीर आरोप; जुने वक्तव्य Viral )
मी माझा रन-अप सुरू केला, पण 'माही भाई' म्हणाले की त्यांनी मला गोलंदाजीसाठी बोलावले नाही आणि ते ईश्वरला बोलावण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी अंपायरनं सांगितले की मी रन-अप सुरू केल्यामुळे मलाच बॉलिंग करावी लागेल. त्यामुळे ते माझ्यावर रागवले. त्यांनी मला शिवीगाळ केली. ''
मोहितने पुढे सांगितले की, त्याच ओव्हरमध्ये त्याने एक विकेट घेतली तरी धोनीचा राग शांत झाला नव्हता.
"मी पहिल्याच बॉलवर युसूफ पठाणची विकेट घेतली. त्या विकेटचे सेलिब्रेशन करतानाही 'माही भाई' मला शिवीगाळ करत होते ," असे मोहितने हसत-हसत सांगितले.
मोहित शर्माला अगदी तरुणपणी धोनीच्या संतापाचा सामना करावा लागला. पण, धोनीच्या मोहितचा धोनीच्या नेतृत्वाखालील CSK मध्ये एक चांगला बॉलर म्हणून उदय झाला होता. 2013 ते 2015 दरम्यान, मोहित सीएसकेसाठी एक महत्त्वाचा बॉलर होता. त्याने 47 सामन्यांमध्ये 57 विकेट्स घेतल्या होत्या.
मोहितने 2014 च्या IPL मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या आणि तो 'पर्पल कॅप' विजेता होता. त्याने 2015 च्या विश्वचषकात धोनीच्या नेतृत्वाखाली भारताचे प्रतिनिधित्वही केले होते.