
Irfan Patan on MS Dhoni : टीम इंडियाचा माजी ऑल राऊंडर इरफान पठाण 2012 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक गायब झाला. विशेष म्हणजे इरफाननं त्याच्या शेवटच्या वन-डे मॅचमध्ये 5 विकेट्स घेतल्या होत्या. पण, नंतर इरफान वन-डे टीममध्ये दिसला नाही. इरफानला पुन्हा संधी का मिळाली नाही? पडद्यामागे काय विचार झाला? हे सर्व तत्कालीन टीम मॅनेजमेंटलाच माहिती आहे.
पण, तत्कालीन कॅप्टन महेंद्रसिंह धोनीवर इराफानला योग्य वागणूक दिली नाही, असा आरोप झाला होता. स्वत: इरफाननं देखील या विषयावर एका मुलाखतीमध्ये रोखठोक मत व्यक्त केलं होतं. त्यानं त्या मुलाखतीमध्ये धोनीबाबतही खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. इरफाननं 2020 साली ही मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीमधील हा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
काय म्हणाला होता इरफान?
इरफान पठाणनं 'स्पोर्ट्स तक' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, महेंद्रसिंह धोनी माझ्या बॉलिंगवर समाधानी नसल्याचं मी 2008 साली मीडियामध्ये ऐकले होते. त्याने याबाबत धोनीला विचारलं देखील होतं. पण, तसा कोणताही मुद्दा नसल्याचं धोनीनं त्याला सांगितलं.
( नक्की वाचा : Slapgate Video : ललित मोदींनी 17 वर्षांनी बाहेर काढला हरभजन-श्रीशांत 'स्लॅपगेट'चा व्हिडिओ; पाहा काय घडलं होतं )
इरफान या विषयावर बोलताना म्हणाला की, "हो, मी त्याला 2008 च्या ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान विचारले होते. 'माही भाई'चे (धोनीचे) वक्तव्य मीडियामध्ये आले की इरफान चांगली बॉलिंग करत नाही. मला वाटले की मी संपूर्ण सीरिजमध्ये चांगली बॉलिंग केली होती, म्हणून मी गेलो आणि 'माही भाईं'ना याबद्दल विचारले.
कधीकधी, मीडियामध्ये वक्तव्य फिरवून प्रसिद्ध केली जातात, म्हणून मलाही स्पष्टीकरण हवे होते. 'माही भाई' म्हणाले, 'नाही इरफान, असे काही नाहीये, सर्वकाही योजनांनुसार सुरू आहे.' जेव्हा तुम्हाला असे उत्तर मिळते, तेव्हा तुम्ही विश्वास ठेवता की ठीक आहे, तुम्ही जे करू शकता ते करा. तसेच, तुम्ही यानंतर पुन्हा पुन्हा स्पष्टीकरण मागत राहिलात तर त्यामध्ये तुमचा स्वाभिमान दुखावला जातो.," असे तो मुलाखतीत म्हणाला.
धोनी आणि हुक्का
इरफान पठाण एवढ्यावरच थांबला नाही. त्यानं यावेळी धोनीलाही टोमणा मारला. धोनीला खुश करण्यासाठी मी त्याच्या खोलीत जाऊन हुक्का लावून देणारा नाही, असं इरफाननं यावेळी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world