FIFA World Cup 2026: फुटबॉल वर्ल्ड कपचे वेळापत्रक वाचा एका क्लिकवर, नोट करा तुमच्या आवडत्या टीमच्या मॅचची वेळ

FIFA World Cup 2026 Schedule: फुटबॉल वर्ल्ड कपचं काऊंट डाऊन सुरु झालंय.  जागतिक क्रीडा विश्वातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची स्पर्धा अवघ्या काही तासांवर आली आहे.

जाहिरात
Read Time: 5 mins
FIFA World Cup 2026 Schedule: मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याने या वर्ल्ड कपला सुरुवात होईल.
मुंबई:

FIFA World Cup 2026 Schedule: फुटबॉल वर्ल्ड कपचं काऊंट डाऊन सुरु झालंय.  जागतिक क्रीडा विश्वातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची स्पर्धा अवघ्या काही तासांवर आली आहे. क्रीडा जगतातील आजवरचा सर्वात मोठा महाकुंभ ऐतिहासिक पद्धतीने खेळवला जाणार आहे. यावेळी स्पर्धेचे यजमानपद एकाच नव्हे, तर तीन देशांकडे आहे. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या तीन देशांमध्ये मिळून हा थरार रंगणार आहे. या महायुद्धात एकूण 48 संघ सहभागी होणार असून त्यांच्यात जेतेपदासाठी जोरदार लढत पाहायला मिळेल.

नव्या रचनेचा वापर

या स्पर्धेत पहिल्यांदाच एका नव्या रचनेचा वापर केला जाणार आहे. एकूण 48 संघांची 12 ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक ग्रुपमधील अव्वल दोन संघ आणि तिसऱ्या क्रमांकावरील सर्वोत्तम 8 संघ बाद फेरीत म्हणजेच राउंड ऑफ 32 मध्ये प्रवेश करतील. संपूर्ण ग्रुप स्टेजमध्ये एकूण 72 सामने खेळवले जाणार आहेत. 

Advertisement

भारतीय वेळेनुसार या महासंघाची सुरुवात 12 जून रोजी मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याने होणार आहे. तर या महाकुंभाचा अंतिम सामना 20 जुलै रोजी न्यू जर्सी येथे खेळवला जाईल. भारतीय फुटबॉल प्रेमींसाठी या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

फुटबॉल वर्ल्ड कप 2026 चे संपूर्ण वेळापत्रक

शुक्रवार, 12 जून

ग्रुप A: मेक्सिको विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मध्यरात्री 12:30 वाजता - मेक्सिको सिटी

ग्रुप A: दक्षिण कोरिया विरुद्ध झेकिया, सकाळी 7:30 वाजता - झॅपोपन

शनिवार, 13 जून

ग्रुप B: कॅनडा विरुद्ध बोस्निया आणि हर्झगोव्हिना, मध्यरात्री 12:30 वाजता - टोरांटो

ग्रुप D: युएसए विरुद्ध पॅराग्वे, सकाळी 6:30 वाजता - लॉस एंजेलिस

रविवार, 14 जून

ग्रुप B: कतार विरुद्ध स्वित्झर्लंड, मध्यरात्री 12:30 वाजता - सांता क्लारा

ग्रुप C: ब्राझील विरुद्ध मोरोक्को, पहाटे 3:30 वाजता - न्यू जर्सी

ग्रुप C: हैती विरुद्ध स्कॉटलंड, सकाळी 6:30 वाजता - फॉक्सबरो

ग्रुप D: ऑस्ट्रेलिया विरुद्ध तुर्की, सकाळी 9:30 वाजता - व्हँकुव्हर

ग्रुप E: जर्मनी विरुद्ध कुराकाओ, रात्री 10:30 वाजता - हॉस्टन

सोमवार, 15 जून

ग्रुप F: नेदरलँड्स विरुद्ध जपान, पहाटे 1:30 वाजता - आर्लिंग्टन

ग्रुप E: आयव्हरी कोस्ट विरुद्ध इक्वेडोर, पहाटे 4:30 वाजता - फिलाडेल्फिया

ग्रुप F: स्वीडन विरुद्ध ट्युनिशिया, सकाळी 7:30 वाजता - ग्वाडलाजारा

ग्रुप H: स्पेन विरुद्ध केप व्हर्डे, रात्री 9:30 वाजता - अटलांटा

मंगळवार, 16 जून

ग्रुप G: बेल्जियम विरुद्ध इजिप्त, मध्यरात्री 12:30 वाजता - सिएटल

ग्रुप H: सौदी अरेबिया विरुद्ध उरुग्वे, पहाटे 3:30 वाजता - मियामी

ग्रुप G: इराण विरुद्ध न्यूझीलंड, सकाळी 6:30 वाजता - लॉस एंजेलिस

बुधवार, 17 जून

ग्रुप I: फ्रान्स विरुद्ध सेनेगल, मध्यरात्री 12:30 वाजता - न्यू जर्सी

ग्रुप I: इराक विरुद्ध नॉर्वे, पहाटे 3:30 वाजता - फॉक्सबरो

ग्रुप J: अर्जेंटिना विरुद्ध अल्जेरिया, सकाळी 6:30 वाजता - कान्सास सिटी

ग्रुप J: ऑस्ट्रिया विरुद्ध जॉर्डन, सकाळी 9:30 वाजता - सांता क्लारा

ग्रुप K: पोर्तुगाल विरुद्ध डीआर काँगो, रात्री 10:30 वाजता - हॉस्टन

गुरूवार, 18 जून

ग्रुप L: इंग्लंड विरुद्ध क्रोएशिया, पहाटे 1:30 वाजता - आर्लिंग्टन

ग्रुप L: घाना विरुद्ध पनामा, पहाटे 4:30 वाजता - टोरांटो

ग्रुप K: उझबेकिस्तान विरुद्ध कोलंबिया, सकाळी 7:30 वाजता - मेक्सिको सिटी

ग्रुप A: झेकिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रात्री 9:30 वाजता - अटलांटा

शुक्रवार, 19 जून

ग्रुप B: स्वित्झर्लंड विरुद्ध बोस्निया आणि हर्झगोव्हिना, मध्यरात्री 12:30 वाजता - लॉस एंजेलिस

ग्रुप B: कॅनडा विरुद्ध कतार, पहाटे 3:30 वाजता - व्हँकुव्हर

ग्रुप A: मेक्सिको विरुद्ध दक्षिण कोरिया, सकाळी 6:30 वाजता - झॅपोपन

शनिवार, 20 जून

ग्रुप D: युएसए विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मध्यरात्री 12:30 वाजता - सिएटल

ग्रुप C: स्कॉटलंड विरुद्ध मोरोक्को, पहाटे 3:30 वाजता - फॉक्सबरो

ग्रुप C: ब्राझील विरुद्ध हैती, सकाळी 6:00 वाजता - फिलाडेल्फिया

ग्रुप D: तुर्की विरुद्ध पॅराग्वे, सकाळी 8:30 वाजता - सांता क्लारा

ग्रुप F: नेदरलँड्स विरुद्ध स्वीडन, रात्री 10:30 वाजता - हॉस्टन

रविवार, 21 जून

ग्रुप E: जर्मनी विरुद्ध आयव्हरी कोस्ट, पहाटे 1:30 वाजता - टोरांटो

ग्रुप E: इक्वेडोर विरुद्ध कुराकाओ, पहाटे 5:30 वाजता - कान्सास सिटी

ग्रुप F: ट्युनिशिया विरुद्ध जपान, सकाळी 9:30 वाजता - ग्वाडलाजारा

ग्रुप H: स्पेन विरुद्ध सौदी अरेबिया, रात्री 9:30 वाजता - अटलांटा

सोमवार, 22 जून

ग्रुप G: बेल्जियम विरुद्ध इराण, मध्यरात्री 12:30 वाजता - लॉस एंजेलिस

ग्रुप H: उरुग्वे विरुद्ध केप व्हर्डे, पहाटे 3:30 वाजता - मियामी

ग्रुप G: न्यूझीलंड विरुद्ध इजिप्त, सकाळी 6:30 वाजता - व्हँकुव्हर

ग्रुप J: अर्जेंटिना विरुद्ध ऑस्ट्रिया, रात्री 10:30 वाजता - आर्लिंग्टन

मंगळवार, 23 जून

ग्रुप I: फ्रान्स विरुद्ध इराक, पहाटे 2:30 वाजता - फिलाडेल्फिया

ग्रुप I: नॉर्वे विरुद्ध सेनेगल, पहाटे 5:30 वाजता - टोरांटो

ग्रुप J: जॉर्डन विरुद्ध अल्जेरिया, सकाळी 8:30 वाजता - सांता क्लारा

ग्रुप K: पोर्तुगाल विरुद्ध उझबेकिस्तान, रात्री 10:30 वाजता - हॉस्टन

बुधवार, 24 जून

ग्रुप L: इंग्लंड विरुद्ध घाना, पहाटे 1:30 वाजता - फॉक्सबरो

ग्रुप L: पनामा विरुद्ध क्रोएशिया, पहाटे 4:30 वाजता - फॉक्सबरो

ग्रुप K: कोलंबिया विरुद्ध डीआर काँगो, सकाळी 7:30 वाजता - झॅपोपन

गुरूवार, 25 जून

ग्रुप B: स्वित्झर्लंड विरुद्ध कॅनडा, मध्यरात्री 12:30 वाजता - व्हँकुव्हर

ग्रुप B: बोस्निया आणि हर्झगोव्हिना विरुद्ध कतार, मध्यरात्री 12:30 वाजता - सिएटल

ग्रुप C: मोरोक्को विरुद्ध हैती, पहाटे 3:30 वाजता - अटलांटा

ग्रुप C: स्कॉटलंड विरुद्ध ब्राझील, पहाटे 3:30 वाजता - मियामी

ग्रुप A: दक्षिण आफ्रिका विरुद्ध दक्षिण कोरिया, सकाळी 6:30 वाजता - ग्वाडलाजारा

ग्रुप A: झेकिया विरुद्ध मेक्सिको, सकाळी 6:30 वाजता - मेक्सिको सिटी

शुक्रवार, 26 जून

ग्रुप E: कुराकाओ विरुद्ध आयव्हरी कोस्ट, पहाटे 1:30 वाजता - फिलाडेल्फिया

ग्रुप E: इक्वेडोर विरुद्ध जर्मनी, पहाटे 1:30 वाजता - न्यू जर्सी

ग्रुप F: ट्युनिशिया विरुद्ध नेदरलँड्स, पहाटे 4:30 वाजता - कान्सास सिटी

ग्रुप F: जपान विरुद्ध स्वीडन, पहाटे 4:30 वाजता - आर्लिंग्टन

ग्रुप D: तुर्की विरुद्ध युएसए, सकाळी 7:30 वाजता - लॉस एंजेलिस

ग्रुप D: पॅराग्वे विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सकाळी 7:30 वाजता - सांता क्लारा

शनिवार, 27 जून

ग्रुप I: नॉर्वे विरुद्ध फ्रान्स, मध्यरात्री 12:30 वाजता - फॉक्सबरो

ग्रुप I: सेनेगल विरुद्ध इराक, मध्यरात्री 12:30 वाजता - टोरांटो

ग्रुप H: केप व्हर्डे विरुद्ध सौदी अरेबिया, पहाटे 5:30 वाजता - हॉस्टन

ग्रुप H: उरुग्वे विरुद्ध स्पेन, पहाटे 5:30 वाजता - झॅपोपन

ग्रुप G: न्यूझीलंड विरुद्ध बेल्जियम, सकाळी 8:30 वाजता - व्हँकुव्हर

ग्रुप G: इजिप्त विरुद्ध इराण, सकाळी 8:30 वाजता - सिएटल

रविवार, 28 जून

ग्रुप L: पनामा विरुद्ध इंग्लंड, पहाटे 2:30 वाजता - न्यू जर्सी

ग्रुप L: क्रोएशिया विरुद्ध घाना, पहाटे 2:30 वाजता - फिलाडेल्फिया

ग्रुप K: कोलंबिया विरुद्ध पोर्तुगाल, पहाटे 5:00 वाजता - मियामी

ग्रुप K: डीआर काँगो विरुद्ध उझबेकिस्तान, पहाटे 5:00 वाजता - अटलांटा

ग्रुप J: अल्जेरिया विरुद्ध ऑस्ट्रिया, सकाळी 7:30 वाजता - कान्सास सिटी

ग्रुप J: जॉर्डन विरुद्ध अर्जेंटिना, सकाळी 7:30 वाजता - आर्लिंग्टन

( नक्की वाचा : Shreyas Iyer : कोच गंभीरचा सल्ला धुडकावून निवड समितीला का केलं अय्यरला कॅप्टन? वाचा 4 प्रमुख कारणं )
 

Topics mentioned in this article