FIFA WC 2026: 'या' संघानं तब्बल 36 वर्षांनी वर्ल्डकपमध्ये मिळवला विजय, तर ब्राझिलची पहिल्याच सामन्यात दमछाक

जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे लक्ष ब्राझिल विरुद्ध मोरोक्को या मॅचकडे लागली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

फिफा विश्वचषक 2026 च्या ग्रुप C मधील सामन्यात स्कॉटलंडने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यांनी  हैतीवर 1-0 ने मात केली. स्कॉटलंडचा हा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक विजय ठरला आहे. त्याला कारण ही तसेच आहे. स्कॉटलंडचा विश्वचषकातील हा तब्बल 36 वर्षांनंतरचा पहिला विजय ठरला आहे. यापूर्वी स्कॉटलंडने 1990 मध्ये फुटबॉल वर्ल्डकपमध्ये शेवटचा विजय मिळवला होता. 1982 नंतर पहिल्यांदाच स्कॉटलंडला विश्वचषकातील आपल्या सलामीच्या सामन्यात विजय मिळवता आला आहे. 

1998 नंतर पुरुषांच्या विश्वचषकात खेळणारा स्कॉटलंडचा हा पहिलाच सामना होता. ​सामन्याच्या 29 व्या मिनिटाला जॉन मॅकगिनने केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर स्कॉटलंडने आघाडी घेतली होती.  ही आघाडी शेवट पर्यंत कायम राहीली. गोल केल्यानंतर स्कॉटलंडने हैतीला सामन्यात परत येण्याची संधीच दिली नाही.  हैतीच्या खेळाडूंनी गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. पण स्कॉटलंडच्या बचावापुढे त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. या विजयासह स्कॉटलंडने ग्रुप C मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.

Advertisement

नक्की वाचा - फुटबॉल प्रेमींसाठी गूड न्यूज! 1 रुपयाही खर्च न करता मोबाईल, टीव्हीवर फ्री दिसणार FIFA World Cup 2026 चे सामने

दुसरीकडे, जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे लक्ष ब्राझिल विरुद्ध मोरोक्को या मॅचकडे लागली होती. ब्राझिलकडून त्यांच्या चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. त्यामुळे ब्राझिलचे चाहते मोठ्या संख्येने सामना पाहण्यासाठी आले होते. सध्या संघ एका वेगळ्याच अडचणीतून जात आहे. अशा वेळी संघाचे मनोबल वाढवण्यासाठी संपूर्ण स्टेडिअम खचाखच भरलं होतं. माहोल ब्राझिल संघासाठी सकारात्मक होता. त्यामुळे ही मॅच एकतर्फी होईल असं वाटत होतं. पण सर्वांचाच हा अंदाज मोरोक्कोने चुकवला.  

नक्की वाचा - बाप से बढकर बेटा! फिफा वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्या 5 पिता-पुत्रांच्या जोड्या, 'ही' एक गोष्ट आहे सर्वांमध्ये समान

इटालियन प्रशिक्षक कार्लो एन्सेलोटी यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राझिलचा संघा हा वर्ल्डकप खेळत आहे. पाच वेळा ब्राझिलने वर्ल्डकप जिंकला आहे. पण या वर्ल्डकपची त्यांची सुरूवात अत्यंत निराशाजनक झाली. सामन्यात मोरोक्कोने पहिला गोल करत ब्राझीलला दबावात आणले होते. ब्राझीलच्या खेळाडूंमध्ये नेहमीचा आक्रमक अंदाज दिसून आला नाही. अखेर स्टार खेळाडू विनीसियस जूनियरच्या चमकदार कामगिरीमुळे ब्राझीलचा पराभव टळला. त्याने मोक्याच्या क्षणी गोल करत सामना बरोबरीत सोडवला. ब्राझीलच्या या सुमार कामगिरीवर स्टेडियममधील चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Advertisement