Lionel Messi: सेमीफायनलच्या लढतीपूर्वी मेस्सी पिणार 'तो' खास चहा? वाचा काय आहे ते सिक्रेट कनेक्शन

FIFA World Cup 2026: फुटबॉल वर्ल्ड कप 2026 च्या दुसऱ्या सेमीफायनलचा थरार अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. संपूर्ण जगाचे डोळे सध्या अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू आणि कॅप्टन लिओनेल मेस्सीवर आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
Lionel Messi: मेस्सी मॅचपूर्वी काय करतो? याची फॅन्सना प्रचंड उत्सुकता असते.
मुंबई:

FIFA World Cup 2026: फुटबॉल वर्ल्ड कप 2026 च्या दुसऱ्या सेमीफायनलचा थरार अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. संपूर्ण जगाचे डोळे सध्या अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू आणि कॅप्टन लिओनेल मेस्सीवर आहेत. या वर्ल्ड कपमध्ये मेस्सीच्या नावावर 8 गोल तर एकूण 6 वर्ल्ड कप मिळून सर्वाधिक 21 गोलचा ऐतिहासिक रेकॉर्ड आहे. 24 जून रोजी 39 वर्षांचा झालेला मेस्सी मैदानावर उतरण्यापूर्वी नेमका काय करतो, तो कोणता खास चहा पितो, काय खातो, कोणते संगीत ऐकतो आणि देवाला काय प्रार्थना करतो, याबद्दल फॅन्समध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

मेस्सी मॅचपूर्वी काय करतो?

जगातील अनेक मोठे खेळाडू,मॅचच्या आधी काही ठराविक अंधश्रद्धा किंवा परंपरा पाळतात. मात्र, मेस्सी अशा कोणत्याही पारंपरिक अंधश्रद्धा मानत नाही. मेस्सी सांगतो की, मॅचच्या आधी तो कोणत्याही गोष्टीचा बाऊ करत नाही. खोलीमध्ये जे कपडे किंवा बूट समोर दिसतील, ते तो सहज घालून मैदानावर जातो. तो स्वतःला कोणत्याही दबावात ठेवत नाही.

Advertisement

अनेक खेळाडू मॅचपूर्वी स्वतःला चार्ज करण्यासाठी किंवा जोश आणण्यासाठी ओरडतात किंवा वेगळा आक्रमक पवित्रा घेतात. यावर मेस्सीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो मॅचच्या आधी ओरडणारा किंवा आरडाओरडा करणारा खेळाडू नाही. त्याला मॅच सुरू होण्यापूर्वी अत्यंत शांत आणि संयमित राहायला आवडते. तो शांतपणे विचार करतो आणि स्वतःला रिलॅक्स ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याचे सर्वोत्तम निर्णय हे डोक्यातून नाही तर त्याच्या अंतर्मनातून म्हणजेच इन्स्टिंक्टमधून येतात, असे तो मानतो.

( नक्की वाचा : 15 व्या वर्षापासून पत्रकारिता अन् तब्बल 18 वर्ल्ड कपचा अनुभव; 91 वर्षांच्या पत्रकारासमोर मेस्सीचे कोच नतमस्तक! )

60 गाण्यांची खास प्लेलिस्ट

मेस्सीच्या आयुष्यात संगीताचे स्थान खूप महत्त्वाचे आहे, विशेषतः मॅचच्या दिवशी संगीत त्याला खूप मदत करते. संगीत ऐकल्यामुळे त्याला शांत आणि सहज राहण्यास मदत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेस्सीच्या मोबाईलमध्ये 60 गाण्यांची एक खास प्लेलिस्ट आहे. यामध्ये प्रामुख्याने फील्ड, रिहाना आणि AC/DC सारख्या प्रसिद्ध गायकांची आणि बँडची गाणी समाविष्ट आहेत, मॅचपूर्वी ही गाणी ऐकायला मेस्सीला आवडतं.

मॅचपूर्वीची खास हर्बल चहाची परंपरा

अर्जेंटिनाच्या प्रत्येक मोठ्या आणि महत्त्वाच्या मॅचपूर्वी मेस्सीचा एक खास नियम पाहायला मिळतो. मेस्सी त्याचा सहकारी खेळाडू डि पॉल आणि अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष क्लॉडिओ 'चिकी' तापिया यांच्यासोबत बसून 'मेट' नावाचा एक खास हर्बल चहा पितो. चहा पितानाचा त्यांचा एक फोटो नेहमी समोर येतो. 

ही परंपरा 2022 चा वर्ल्ड कप आणि 2024 च्या कोपा अमेरिका स्पर्धेतही पाहायला मिळाली होती. चिकी तापिया हे 2017 पासून अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि मेस्सीसोबत त्यांची छान गट्टी आहे.

Advertisement

देवावर प्रचंड श्रद्धा

लिओनेल मेस्सीला त्याचे कोट्यवधी फॅन्स देवाचा दर्जा देतात, पण मेस्सी स्वतः कमालीचा आस्तिक आहे. त्याची देवावर  श्रद्धा आहे. 2022 मध्ये जेव्हा अर्जेंटिनाने वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा मेस्सीने एक अतिशय भावनिक विधान केले होते. तो म्हणाला होता की, मी मैदानावर काहीच केले नाही, ते तर देवानेच माझ्याकडून तसे खेळवून घेतले. गेल्या 3 दशकांहून अधिक काळ घेतलेली कठोर मेहनत आणि देवाचा आशीर्वाद यामुळेच मी आज या मुक्कामावर पोहोचलो आहे, असे मेस्सी अगदी नम्रपणे मानतो.