Sunrisers Hyderabad Team: सनरायझर्स हैदराबादचे खेळाडू थांबलेल्या हॉटेलला आग, पाहा Video

Fire erupted hotel in Hyderadbad : अग्निशमन दलाच्या जवानांना काही वेळातीच ही आग विझवली. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

जाहिरात
Read Time: 1 min

IPL 2025 : सनरायझर्स हैदराबाद टीमचे खेळाडू ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी सकाळी ही आगीची घटना घडली आहे. हॉटेलच्या एका मजल्यावर ही आग लागली होती.

काही वेळातच आगीने रोद्र रुप धारण केलं होतं. मात्र हॉटेल स्टाफने तातडीने घटनेची अग्नीशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांना काही वेळातीच ही आग विझवली.  

बंजारा हिल्स परिसरातील पार्क हयात हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली होती. आगीनंतर कॉरिडॉरमध्ये दाट धुराचे लोट पसरले होते. अग्निशमन दलाच्या जवानांना काही वेळातीच आगीवर नियंत्रण मिळवलं आणि मोठा अनर्थ टळला. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

खबरदारीचा उपाय म्हणून सर्व खेळाडून दुसऱ्या हॉटेलमध्ये हलवण्यात आलं आहे. याच पार्क हयात हॉटेलमध्ये आज 'ओडेला 2' या आगामी तेलुगू चित्रपटाचा प्री-रिलीज सोहळा पार पडणार होता.

Advertisement
Topics mentioned in this article