इंग्लंडचा माजी कसोटीपटू ग्रॅहम थोर्प ( Graham Thorpe) 5 ऑगस्ट 2024 रोजी निधन झालं. 55 वर्षांच्या क्रिकेटपटूचं निधनाचं कारण तेंव्हा जाहीर करण्यात आलं नव्हतं. थोर्पच्या मृत्यूनंतर 7 दिवसांनी याचं धक्कादायक कारण उघड झालं आहे. थोर्पनं स्वत:चं आयुष्य संपवलं, असा गौप्यस्फोट त्याची पत्नी अंमाडा थोर्पनं केला आहे. थोर्प बऱ्याच काळापासून शारीरिक आणि मानसिक आजारांशी संघर्ष करत होता. त्यानं दोन वर्षांपूर्वी देखील जीव देण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती अमांडानं दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमांडानं इंग्लंडचा माजी कॅप्टन माईक आथरटनला दिलेल्या मुलाखतीमध्ये नवऱ्याच्या मृत्यूचं नेमकं कारण सांगितलंय. 'त्याचं पत्नी आणि दोन मुलींवर खूप प्रेम होतं. कुटुंबाचंही त्याच्यावर प्रेम होतं. त्यानंतरही तो बरा झाला नाही. गेल्या काही दिवसांपून तो खूप आजारी होता. त्याच्याशिवाय आम्ही चांगलं राहू असं त्याला वाटत होतं. त्यानं स्वत:चं आयुष्य संपवलं याचं आम्हाला खूप वाईट वाटत आहे. त्याला बऱ्याच काळापासून डिप्रेशनचा त्रास होता. याच कारणामुळे त्यानं मार्च 2022 मध्ये जीव देण्याचा गंभीर प्रयत्न केला होता. त्यावेळी तो 2 महिने हॉस्पिटलमध्ये होता.'
अमांडानं पुढं सांगितलं की, ' जुना ग्रॅहम दिसू लागल्यानं आम्हाला आशा वाटत होती. पण, तो यामधून बाहेर पडू शकला नाही. त्याचा त्रास कधी-कधी खूप गंभीर होत असे. आम्ही कुटूंबीयांनी त्याला भक्कम पाठिंबा दिला. त्याच्यावर अनेक उपचार केले. पण, दुर्दैवानं त्यापैकी कशाचाही उपाय झाला नाही. '
'ग्रॅहमला मैदानात नेहमीच मानसिकदृष्ट्या कणखर खेळाडू म्हणून पाहिलं गेलं. त्याची तब्येतही चांगली होती. पण, मानसिक आजार हे एक वास्तव दुखणं आहे. हा आजार कुणालाही प्रभावित करु शकतो,' असं अमांडानं सांगितलं.
( ट्रेंडिंग बातमी - Vinod Kambli : 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर विनोद कांबळी पहिल्यांदा दिसला, तब्येतीबाबत म्हणाला...)
थोर्पची कारकिर्द
इंग्लंडकडून 100 टेस्ट खेळणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये थोर्पेचा समावेश होता. 1993 ते 2005 या कालावधीमध्ये त्यानं 100 टेस्टमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं. यामध्ये त्यानं 16 सेंच्युरी आणि 39 हाफ सेंच्युरीसह 6744 रन काढले. थोर्प 82 वन-डे खेळला. त्यामध्ये त्यानं 21 हाफ सेंच्युरीसह 2380 रन केले.
इंग्लिश कौंटीमधील दिग्गज खेळाडूंमध्ये ग्रॅहम थोर्पचा समावेश होतो. त्यानं 341 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 49 सेंच्युरींच्या मदतीनं 21937 रन काढले होते. तसंच A श्रेणीच्या क्रिकेटमध्ये 9 सेंच्युरीसह 10871 रन काढले.
( ट्रेंडिंग बातमी - बाबर आझमच्या पोस्टनं पाकिस्तानात गोंधळ, Arshad Nadeem चं अभिनंदन आलं अंगाशी )
2013 साली तो इंग्लंडच्या वन-डे आणि T20 टीमचा बॅटींग कोच होता. त्याचबरोबर 2020 साली पाकिस्तान विरुद्धच्या सीरिजमध्ये इंग्लंडचा हंगामी कोच म्हणूनही त्यानं काम केलं आहे. थोर्पची 2022 साली अफगाणिस्तानचा हेड कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याचवेळी तो गंभीर आजारी पडला. याच आजारपणात त्याचं निधन झालं.