Vinod Kambli Problem : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याला मागच्या महिन्यात तब्येत अचानक बिघडल्यानं ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. विनोदची प्रकृती बरी झाली असून नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी (1 जानेवारी 2025) रोजी विनोदला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. विनोदला डिस्चार्ज मिळाल्यानं त्याचे फॅन्स आनंदीत आहेत. त्याचवेळी त्यांच्या काळजीमध्ये भर टाकणारी एक बातमी समोर आलीय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विनोदची आर्थिक परिस्थिती नाजूक
विनोद कांबळी गेल्या काही दिवसांपासून आर्थिक परिस्थितीशी झगडतोय. ही परिस्थिती इतकी गंभीर बनलीय की त्याच्याकडं गेल्या सहा महिन्यांपासून फोन देखील नाही. 'न्यूज 18' नं दिलेल्या वृत्तानुसार विनोदनं त्याचा आयफोन दुरुस्तीसाठी एका दुकानात दिला होता. पण, त्याच्या दुरुस्ती बिल 15 हजार रुपये विनोदनं अजून दिलेली नाहीत. त्यामुळे दुकानदारानं हा फोन अजून विनोदला परत केलेला नाही. तो दुकानदाराच्याच ताब्यात आहे.
विनोदला बीसीसीआयकडून 30 हजार रुपये मासिक पेन्शन मिळतं. त्याचबरोबर त्याला राजकीय पक्षाकडून नुकतीच पाच लाखांची मदत मिळाली आहे. विनोदची पत्नी एंड्रिया हेविटनं दिलेल्या माहितीनुसार त्यानं सोसायटीचे 18 लाख देखभाल शुल्क (Maintenance Fees) अद्याप दिलेली नाही. त्यामुळे त्याचं घर देखील कधीही जप्त होऊ शकतं.
( नक्की वाचा : Vinod Kambli Dance : 'चक दे इंडिया' गाण्यावर नाचला विनोद कांबळी, हॉस्पिटलमध्येही जोश कायम, Video )
कांबळी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर त्याच्याकडं हॉस्पिटलला देण्यासाठी पैसे देखील पुरेसे नव्हते. पण, त्यावेळी वेगवेगळ्या व्यक्ती तसंच माजी क्रिकेटपटूंनी विनोदला मदत केली. त्यानंतर त्याला बुधवारी (1 जानेवारी 2025) दुपारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.
विनोदला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज
विनोद कांबळीची तब्येत अचानक ढासाळल्यानं त्याला 21 डिसेंबर रोजी ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कांबळीच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यानं तो बेशुद्ध झाला होता, अशी माहिती त्याच्या मेडिकल रिपोर्टमधून समोर आली होती.
( नक्की वाचा : मित्र असावा तर असा... सचिन तेंडुलकरनं घेतली विनोद कांबळीची भेट ! Video पाहून फॅन्स इमोशनल )
विनोदची तब्येत बरी झाल्यानं त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर त्याने पुष्पा स्टाईल मारत झुकेगा नही साला असाच संदेश दिला. शिवाय आजाराला हवरून आपण पुन्हा मैदानात उतरु असा विश्वास त्यानं व्यक्त केला.
या लोकांनी मला फिट केलं आहे. मी ही आधी सांगितलं होतं फिट होवूनच घरी येणार. आता मी फिट झालो आहे. त्याचे श्रेय हॉस्पिटलचे आहे. त्यांनी मला घरी जाण्याआधी थोडी क्रिकेटची प्रॅक्टीसही दिली. मी आता शिवाजीपार्कात ही परतणार आहे. कधीच क्रिकेट सोडणार नाही. मी खेळत राहणार. मी लवकरच मैदानात दिसेन असा दावा 52 वर्षांच्या कांबळीनं केला. मी कधीही क्रिकेट सोडणार नाही, असं तो यावेळी म्हणाला.