जाहिरात

मित्र असावा तर असा... सचिन तेंडुलकरनं घेतली विनोद कांबळीची भेट ! Video पाहून फॅन्स इमोशनल

Sachin Tendulkar Vinod Kambli Video : सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे जुने मित्र एका कार्यक्रमात एकत्र आले होते.

मित्र असावा तर असा... सचिन तेंडुलकरनं घेतली विनोद कांबळीची भेट ! Video पाहून फॅन्स इमोशनल
Sachin Tendulkar Vinod Kambli Video
मुंबई:

Sachin Tendulkar Vinod Kambli Video : सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या दोन भारतीय क्रिकेटपटूंची मैत्री संपूर्ण क्रिकेट विश्वात प्रसिद्ध आहे. या दोघांनीही मुंबईतील शारदाश्रम शाळेत रमाकांत आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवले. सचिन आणि विनोद यांनी 1988 साली शारदाश्रम शाळेकडून खेळताना शालेय क्रिकेटमध्ये 664 रनची पार्टनरशिप केली होती. त्यानंतर या दोन्ही मित्रांनी टीम इंडियात पदार्पण केले. सचिननं धावांच्या राशी रचल्या. सर्व रेकॉर्ड्स मोडले. त्याला भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारानं गौरवण्यात आलं. दुर्दैवानं विनोद कांबळीची कारकिर्द अन्य कारणांमुळेच गाजली. त्यामुळे ती फार बहरली नाही.

सचिन तेंडुलकर संपूर्ण क्रिकेट विश्वाचं दैवत आहे. तर विनोद कांबळीचे फॅन्सचीही संख्या मोठी आहे. हे दोघं जुने मित्र मुंबईतील एका कार्यक्रमात एकत्र आले होते. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

( नक्की वाचा : विनोद कांबळीचं उदाहरण दिलं तरी पृथ्वी शॉला समजलं नाही, प्रवीण आम्रेनं सांगितला किस्सा )
 

काय आहे व्हिडिओ?

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे दोघं जण मुंबईतील एका कार्यक्रमात एकत्र आले होते. सचिन आणि विनोदचे गुरु रमांकात आचरेकर यांच्या स्मारकाचं अनावरण झालं. या कार्यक्रमाला सचिन आणि विनोद एकत्र आले होते. 

विनोद कांबळी स्टेजवर बसलेला पाहताच सचिन तेंडुलकर पुढं आला. त्यानं आपल्या जुन्या मित्राचा हात हातामध्ये घेतला. सचिनला पाहताच विनोद कांबळी देखील चांगलाच भावुक झाला होता. या दोघांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून क्रिकेट फॅन्सही इमोशनल झाले आहेत. 

विनोदनं केला होती सचिनवर टीका

टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू अशी विनोद कांबळीची ऐकेकाळी ओळख होती. पण, तो खराब फॉर्म आणि बेशिस्त वर्तणुकीमुळे टीम इंडियाच्या बाहेर गेला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विनोद जवळचा मित्र होता. दोघांनीही एकाच काळात मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये क्रिकेटचा श्रीगणेशा केला. विनोदनं त्याच्या आर्थिक तंगीला सचिनला दोषी ठरवलं त्यावेळी सचिननं त्याच्याशी बोलणं बंद केलं होतं. नंतर विनोदनं या प्रकाराबद्दल सचिनची माफी मागितली. त्यानंतर दोघांचे मतभेद दूर झाले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com