'गार्डन में घूमने वाला', गावस्करांनी लक्ष्य सेनवर केलं खळबळजनक वक्तव्य

Sunil Gavaskar on Lakshya Sen: महान क्रिकेटपटू सुनील गावस्करांनी पॅरिस ऑलिम्पिकमधील लक्ष्य सेनच्या खेळावर नाराजी व्यक्त केली आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins
S
मुंबई:

Sunil Gavaskar on Lakshya Sen: टोक्यो ऑलिम्पिकनंतर वाढलेल्या भारतीयांच्या स्वप्नांना पॅरिसमध्ये धक्का बसलाय. भारतानं टोक्योमध्ये आजवरची सर्वोत्तम कामगिरी करत 7 मेडलची कमाई केली होती. त्यामुळे यंदा भारतीय खेळाडू दोन अंकी पदक नक्की जिंकतील असा सर्वांना विश्वास होता. पण, प्रत्यक्षात भारताला फक्त 6 मेडल मिळाले. तितक्याच प्रकारात भारताचे खेळाडू सहाव्या क्रमांकावर आले. चौथ्या क्रमांकावरच्या खेळाडूंमध्ये बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा (Lakshya Sen) देखील समावेश होता. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

2012 पासून प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये भारताला मेडल मिळालं होतं. ही परंपरा यंदा खंडित झाली. भारतीय खेळाडूंच्या या कामगिरीवर दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यापाठोपाठ महान क्रिकेटपटू सुनील गावस्करांनी देखील लक्ष्य सेनच्या खेळावर नाराजी व्यक्त केली आहे. 

लक्ष्य सेनचा व्हिक्टर एक्सेलसन विरुद्ध सेमी फायनलमध्ये पराभव झाला. या पराभवावर गावस्कर यांनी स्पोर्ट्स्टारमधील कॉलममध्ये लिहलंय की, 'सेमी फायनलमध्ये 20-17 आणि 7-0 अशी आघाडी गमावलेली पाहणे आणि नंतर ब्रॉन्झ मेडल मॅचमध्ये पहिला गेम जिंकल्यानंतर पराभूत होणे हे नक्कीच निराशाजनक होते. विमल कुमार, BAI आणि सरकार यांनी TOPS सोबत एकत्र येऊन सर्व प्रकारे प्रयत्न केले. पण, जेंव्हा कसोटीची वेळ आली त्यावेळी लक्ष्य टीम इंडियाच्या कॅप्टनच्या (रोहित शर्मा) शब्दात 'गार्डन में घुमने वाले (बागेत फिरणारा) होता. 

 ट्रेंडिंग बातमी - मनू भाकरच्या आईनं नीरज चोप्राकडून काय वचन मागितलं? दोघांचं खरंच लग्न होणार? मिळालं उत्तर....
 

गावस्करनं या कॉलमध्ये पुढं लिहिलं की, 'सेमीफायनल आणि ब्रॉन्झ मेडल मॅचमधील 'चेंच ओव्हरमध्ये बाटलीतून पाणी पिण्याच्या पद्धतीवरुन लक्ष्यनं आपली एकग्रता गमावली होती,' असं ही मॅच पाहणाऱ्यांना वाटलं. मी पूर्णपणे चुकीचा असेल, पण टीव्हीवर पाहताना तो हरवलेला वाटत होता. 

Advertisement

एकग्राता ही गोष्ट कोणताही कोच शिकवू शकत नाही. कोणत्याही खेळाडूला अन्य चॅम्पियन खेळाडूंना पाहून तसंच स्वत: संकल्प करुन एकग्रता वाढवावी लागते. यासाठी निश्चित कोणते वेळापत्रक नाही. तुमच्याजवळ माईंड ट्रेनर असतो. पण, तो देखील इतकंच करु शकतो. यापेक्षा जास्त नाही. ही गोष्ट खेळाडूंमध्येच असावी लागते.