Gautam Gambhir : गौतम गंभीर खोटारडा, गंभीरच्या KKR मधील सहकाऱ्यानंच केला मोठा आरोप

Gautam Gambhir : टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरवर त्याच्या जुन्या सहकाऱ्यानं गंभीर आरोप केले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Manoj Tiwary Calls Gautam Gambhir Hypocrite: टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरच्या कार्यपद्धतीवर सध्या प्रश्न उपस्थित केला जात आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे. या पराभवाची जखम अजून ताजी आहे. त्याचवेळी गंभीरवर त्याचा माजी सहकारी मनोज तिवारीनं मोठा आरोप केला आहे. गौतम गंभीर ढोंगी आहे. तो जे बोलतो  ते करत नाही, असा आरोप तिवारीनं केलाय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय केला आरोप?

मनोज तिवारीनं सांगितलं की, 'गौतम गंभीर खोटारडा आहे. तो जे करतो ते करत नाही. कॅप्टन मुंबईचा आहे. त्याचबरोबर अभिनेष नायर देखील मुंबईचा आहे. पराभव झाल्यानंतर रोहित शर्माला पुढं करण्यात आलं. गंभीरच्या सुरात सूर मिसळणाऱ्या बॉलिंग कोचचा काय फायदा? मॉर्ने मॉर्केल लखनौ सुपर जायंट्समधून आला आहे. अभिषेक नायर कोलकाता नाईट रायडर्समध्ये त्याच्यासोबत काम करत होता. हे दोघं कधीही गंभीर विरुद्ध बोलणार नाहीत, हे त्याला माहिती आहे.

( नक्की वाचा : Gautam Gambhir : 'भारतीय क्रिकेट तोपर्यंतच सुरक्षित... ड्रेसिंग रुमच्या प्रश्नावर गंभीरनं सुनावलं )
 

इतकंच नाही तर गंभीरनं त्याच्या माजी सहकाऱ्यावर क्रेडीट चोरण्याचाही आरोप केलाय. गौतम गंभीरचा जनसंपर्क (पीआर) मजबूत आहे. त्यामुळे यशाचं सर्व श्रेय त्याला मिळतं, असा आरोप तिवारीनं केला.

याबाबतचं उदाहरण देताना तिवारी म्हणाला, 'गौतम गंभीरनं एकट्याच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवून दिला नव्हता. आम्ही सर्वांनी एकत्र येऊन कठोर मेहनत केली होती. त्यानंतर आम्हाला करंडक उचलण्याची संधी मिळाली. जॅक कॅलीस, सुनील नारायण आणि मी खूप कष्ट केले होते. पण, विजयाचं सर्व श्रेय फक्त त्याला मिळालं.'

Advertisement
Topics mentioned in this article