Gautam Gambhir: विराट कोहलीबरोबरचं नातं कसं आहे? कोच गंभीरनं दिलं सडेतोड उत्तर

Advertisement
Read Time: 2 mins
G
मुंबई:

गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट टीमचा मुख्य कोच झाल्यापासून विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याचं नातं कसं असेल याबाबत चर्चा सुरु आहे. आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान गंभीर आणि कोहलीमध्ये झालेला वाद आजही सर्वांच्या लक्षात आहे. टीम इंडियाचा पदभार स्विकारल्यानंतर झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये गंभीरनं याबाबत उत्तर दिलं आहे. 

गौतम गंभीरला या पत्रकार परिषदेमध्ये विराट कोहलीबाबतच्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. 'विराट कोहलीसोबतचं माझं नातं टीआरपीसाठी नाही. सध्या आम्ही भारताचं प्रतिनिधित्व करत आहोत. 140 कोटी भारतीयांचे प्रतिनिधी आहोत. मैदानाच्या बाहेर आमचं उत्तम नातं आहे. पण, लोकांसाठी नाही. मी खेळाच्या दरम्यान त्याच्याशी किती बोललो हे महत्त्वाचं नाही. तो पूर्णपणे व्यावसायिक आहे. जागतिक स्तरावरील अ‍ॅथलिट आहे. मला आशा आहे की, तो असाच असेल.'

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

... तर 2027 चा वर्ल्ड कप खेळणार

गंभीरनं यावेळी विराट आणि रोहितच्या भविष्यावरही वक्तव्य केलं. 'विराट आणि रोहित दोघांमध्येही आणखी बरंच क्रिकेट बाकी आहे. ते वर्ल्ड क्लास आहेत. कोणत्याही टीमला ते हवे असतील. चॅम्पियन्स ट्रॉफी आहे, ऑस्ट्रेलिया सीरिज आहे. फिटनेस चांगला असेल तर ते 2027 चा वर्ल्ड कप देखील खेळू शकतील.'

सूर्याला कॅप्टन का केलं?

सूर्यकुमार यादवला कॅप्टन का केलं? या विषयावरही गंभीरनं या पत्रकार परिषदेत मत मांडलं. 'दीर्घकाळ खेळू शकेल अशा खेळाडूला आम्हाला कॅप्टन करायचं होतं. हार्दिकबाबत फिटनेसचा मोठा प्रश्न आहे. जास्तीत जास्त मॅच खेळू शकेल असा खेळाडू आम्हाला कॅप्टन म्हणून हवा होता. हार्दिक एक अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याचं स्किल दुर्मीळ आहे. पण, फिटनेस ही त्याची मुख्य समस्या आहे. प्रत्येकवेळी उपलब्ध राहू शकेल, अशा खेळाडूला आम्हाला कॅप्टन करायचं होतं,' असं गंभीरनं सांगितलं. 

Advertisement

( नक्की वाचा : BCCI नं वाढवली मुंबई इंडियन्सची डोकेदुखी, पुढच्या सिझनमध्ये काय होणार? )

श्रीलंका सीरिजसाठी टीम इंडिया

टी20 टीम: सूर्यकुमार यादव (कॅप्टन), शुबमन गिल (व्हाईस कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई , अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि  मोहम्मद सिराज.

वन-डे टीम : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (व्हाईस कॅप्टन), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वाशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.
 

Advertisement

( नक्की वाचा : हार्दिक आणि नताशानं केली घटस्फोटाची अधिकृत घोषणा, मुलाच्या संगोपनाबाबत घेतला निर्णय )