घटस्फोटानंतरही प्रेम कायम! नताशाच्या पोस्टवर हार्दिकची प्रतिक्रिया Viral

Hardik Pandya reacted to Natasa Stankovic post: टीम इंडियाचा स्टार ऑल राऊंडर हार्दिक पांड्या आणि नताशीा स्टेनकोविक यांनी नुकताच घटस्फोट घेतला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Hardik Pandya Natasa Stankovic
मुंबई:

Hardik Pandya reacted to Natasa Stankovic post: टीम इंडियाचा स्टार ऑल राऊंडर हार्दिक पांड्या आणि नताशीा स्टेनकोविक यांनी नुकताच घटस्फोट घेतला आहे. त्यांनी संयुक्त वक्तव्य प्रसिद्ध करत सोशल मीडियावर तशी घोषणा केली. या जोडप्यानं एकाकी वेगळं होण्याचा निर्णय घेतलेला नाही. काही महिन्यांपासून ते वेगळं होणार असल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. अखेर हार्दिक आणि नताशा यांनी त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलं. सध्या हे दोघंही वेगवेगळं राहात आहेत. 

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांनी 2020 साली लग्न केलं होतं. त्यांना 4 वर्षांचा एक लहान मुलगा देखील आहे. त्यांनी आपल्या मुलाचं नाव अगस्त्य ठेवलं आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 


हार्दिक सध्या टीम इंडियासोबत T20 सीरिजसाठी श्रीलंका दौऱ्यावर आहे. तर नताशा मुलगा अगस्त्यसोबत सर्बियामध्ये सुट्टी घालवत आहे. सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असलेल्या नताशानं काही फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

या फोटोमध्ये अगस्त्य त्याच्या आईसोबत एका प्राणीसंग्रहालयात दिसत आहे. हार्दिकनं मुलाचा फोटो पाहिला तेंव्हा त्याला राहवलं नाही. त्यानं रेड हॉर्ट इमोजीच्या मदतीनं अगस्त्य आणि नताशाबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे. हार्दिकचा भाऊ क्रृणाल पांड्यानंही या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. हार्दिकची प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झालीय. 

Advertisement

हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर नताशा भारतीय फॅन्सच्या टार्गेटवर आहे. अनेक फॅन्सनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे. त्याचवेळी घटस्फोट झाला असला तरी नात्यामध्ये कटूता नाही, हेच हार्दिकनं नताशाच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत दाखवून दिलंय. 

Advertisement

कशी झाली नताशा आणि हार्दिकची भेट?

मुळची सर्बियाची असलेल्या नताशानं प्रकाश झा यांच्या 'सत्याग्रह' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ती बिग बॉस तसंच नच बलिए या रिएलिटी शोमध्येही सहभागी झाली होती. हार्दिक आणि नताशाच्या डेटिंगची अफवा 2018 साली सुरु झाली होती. 2019 साली नताशानं एका इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये हार्दिक सर्वात चांगला मित्र असल्याचं सांगितलं होतं.

( नक्की वाचा : हार्दिक आणि नताशानं केली घटस्फोटाची अधिकृत घोषणा, मुलाच्या संगोपनाबाबत घेतला निर्णय )
 

1 जानेवारी 2020 रोजी या दोघांनी सर्व जगाला आश्चर्याचा धक्का देत साखरपुडा केला. त्याचवर्षी जुलैमध्ये अगस्त्यचा जन्म झाला. त्यानंतर 14 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांनी उदयपूरमध्ये पारंपारिक पद्धतीनं लग्न केलं होतं.

Advertisement