जाहिरात

हार्दिक आणि नताशानं केली घटस्फोटाची अधिकृत घोषणा, मुलाच्या संगोपनाबाबत घेतला निर्णय

हार्दिक आणि नताशानं केली घटस्फोटाची अधिकृत घोषणा, मुलाच्या संगोपनाबाबत घेतला निर्णय
मुंबई:

Hardik Pandya And  Natasa Stankovic : टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविकनं (Natasa Stankovic) घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली आहे. दोघांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याची घोषणा केली आहे. हार्दिक आणि नताशा यांच्या घटस्फोटाची T20 वर्ल्ड कपपूर्वीपासून चर्चा सुरु होती. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे.

हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी 2020 साली लग्न केलं होतं. त्याचवर्षी त्यांना अगस्त्य हा मुलगा झाला. अगस्त्यचं संगोपन आम्ही दोघंही करु. तो आमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे. त्याला आनंदी ठेवण्यासाठी जे शक्य आहे ते सर्व करु असं या दोघांनीही जाहीर केलंय. 

नक्की वाचा - IND vs SL : श्रीलंका सीरिजसाठी भारतीय संघ जाहीर, 'गंभीर' पर्वातील टीमची 5 महत्त्वाची वैशिष्ट्यं

काय म्हणाला हार्दिक?

हार्दिक पांड्यानं इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहलंय, ' मी आणि नताशानं 4 वर्ष एकत्र राहिल्यानंतर परस्पर सहमतीनं एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकत्र राहण्याचा सर्वोतपरी प्रयत्न केला. या नात्याला आपलं सर्वस्व दिलं. हा आमच्यासाठी एक कठीण निर्णय होता. आम्हाला एकमेकांपासून मिळालेला आनंद, सन्मान आणि सहकार्य याचा विचार करुन हा निर्णय घेणं दोघांच्याही हिताचं होतं. 

Previous Article
IND vs SL : श्रीलंका सीरिजसाठी भारतीय संघ जाहीर, 'गंभीर' पर्वातील टीमची 5 महत्त्वाची वैशिष्ट्यं
हार्दिक आणि नताशानं केली घटस्फोटाची अधिकृत घोषणा, मुलाच्या संगोपनाबाबत घेतला निर्णय
hardik-pandya-natasa-stankovic-divorce-update-is-hardik-set-to-lose-70-of-his-net-worth-after-separation
Next Article
Hardik Pandya Divorce : हार्दिकच्या संपत्तीमधील 70 टक्के नताशाला मिळणार? काय आहे सत्य?