Hardik -Natasa Divorce Update : टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि मॉडेल-अभिनेत्री नताशा स्टेनकोविकनं (Natasa Stankovic) घटस्फोट केलाय. या दोघांनी 2020 साली लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगा आहे. चार वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी घटस्फोट घेत असल्याचं गुरुवारी (18 जुलै) जाहीर केलं. ही बातमी जाहीर होताच हार्दिकच्या संपत्तीमधील किती टक्के वाटा नताशाला मिळणार? हा प्रश्न चर्चेत आला आहे. नताशाला हार्दिकची 70 टक्के संपत्ती मिळणार असल्याचंही सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
किती आहे नताशाची संपत्ती?
गायक बादशाहाच्या 'डीजे वाले बाबू' गाण्यातून सर्बियाच्या नताशा स्टेनकोविकनं सर्वांचं लक्ष वेधलं. प्रकाश झा यांच्या 2013 साली प्रदर्शित झालेल्या सत्याग्रह या सिनेमातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'बिग बॉस आणि 'नच बलिये' या रिएलिटी शोमध्ये देखील ती सहभागी झाली होती. त्याचबरोबर फुकरे रिटर्न्स आणि झिरो या सिमेमात देखील तिनं काम केलंय.
'टाईम्स नाऊ' नं दिलेल्या वृत्तानुसार नताशाची नेट वर्थ 20 कोटी आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 4 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स असून इन्स्टाग्राममधील प्रमोशनमधूनही तिची कमाई होत आहे.
( नक्की वाचा : हार्दिक आणि नताशानं केली घटस्फोटाची अधिकृत घोषणा, मुलाच्या संगोपनाबाबत घेतला निर्णय )
हार्दिकची संपत्ती किती आहे?
वेगवेगळ्या मीडिया रिपोर्टनुसार हार्दिक पांड्याची नेट वर्थ 94 कोटी आहे. बोट (Boat), ड्रीम 11 (Dream11) गल्फ ऑईल (Gulf Oil), ओप्पो (Oppo), रिलायलन्स रिटेल (Reliance Retail) यासह अनेक बड्या ब्रँड्सचा तो ब्रँड अॅम्बेेसेडर आहे. हार्दिक पांड्या बीसीसीआयचा करारबद्ध खेळाडू असून बीसीसीआयकडन त्याला वार्षिक 5 कोटींचं मानधन आहे. त्याचबरोबर यावर्षीच गुजरात टायटन्सकडून त्याला मुंबई इंडियन्सनं मोठ्या रकमेला खरेदी केलंय.
हार्दिकचा मुंबईत 30 कोटी रुपयांचा फ्लॅट तर बडोद्यामध्ये 3.6 कोटींचं पेंट हाऊस आहे. त्याचबरोबर मर्सिडिस, ऑडी , लँड रोव्हर यासारख्या अलिशान वाहनांचाही तो मालक आहे.
हार्दिकची अर्धी संपत्ती आईच्या नावावर?
हार्दिक आणि नताशा यांच्या घटस्फोटाची गेल्या दोन महिन्यांपासून चर्चा सुरु आहे. या काळात प्रसिद्ध झालेल्या वेगवेगळ्या मीडिया रिपोर्टनुसार हार्दिकनं त्याच्या संपत्तीमधील 50 टक्के हिस्सा आईच्या नावावर केला आहे. या रिपोर्टनुसार हार्दिकचं मुंबई आणि बडोद्यामधील घर, लग्झरी कारसह अनेक गोष्टी त्याच्या आईच्या नावावर आहेत. हार्दिकनं गौरव कपूरला दिलेल्या मुलाखतीमधील एक क्लिप व्हायरल झालीय. या मुलाखतीमध्येही तो आपली अर्धी संपत्ती आईच्या नावावर असल्याचं सांगतोय.
घटस्फोटानंतर काय सांगतो कायदा?
कायदेतज्ज्ञानं दिलेल्या माहितीनुसार घटस्फोट झाल्यानंतर पत्नीला भरण-पोषणाची (स्वत: आणि मूल) रक्कम मिळण्याचा अधिकार आहे. पण, ही रक्कम किती असेल हे कोर्ट निश्चित करेल. त्यामुळे हार्दिकच्या संपत्तीमधील 70 टक्के हिस्सा नताशाला मिळणार या चर्चेला कोणताही आधार नाही. काही दिवसानंतरच याबाबतची नेमकी माहिती समजू शकेल.