टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन हार्दिक पांड्या (Hardiak Pandya) आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक (Natasha Stankovic) यांच्या घटस्फोटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या दोघांचा घटस्फोट झाला तर नताशाला हार्दिकच्या संपत्तीमधील 70 टक्के संपत्ती मिळणार असाही सध्या अनेकांचा समज आहे. या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर नताशा नुकतिच दिशा पटानीच्या कथित बॉयफ्रेंडसोबत लंचसाठी बाहेर पडलेली दिसली. नताशानं या प्रश्नावर 'धन्यवाद' इतकंच उत्तर दिलं. नताशानं नकार न दिल्यानं हार्दिक आणि तिच्यात 'ऑल इज वेल' नसल्याचं बऱ्याच प्रमाणात स्पष्ट झालंय. त्यानंतर अनेक प्रश्न आणि चर्चा सुरु आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हार्दिकची अर्धी संपत्ती आईच्या नावावर?
हार्दिक आणि क्रृणाल पांड्या यांनी त्यांची अर्धी संपत्ती आईच्या नावावर केली असल्याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. त्यामुळे हार्दिकनं घटस्फोट दिला तरी त्याच्या संपत्तीचा 70 टक्के वाटा नताशाला मिळणार नाही, म्हणून हार्दिकचे फॅन्स खुश आहेत. या विषयावर कायदेतज्ज्ञांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
हार्दिकनं त्याची अर्धी संपत्ती आईच्या नावावर केली नसली तरी घटस्फोटानंतर पत्नीला अर्धी संपत्ती मिळू शकत नाही, असं कायदेतज्ज्ञांनी स्पष्ट केलंय.
( नक्की वाचा : 'कुणीतरी रस्त्यावर...' घटस्फोटाच्या चर्चेत हार्दिकच्या पत्नीच्या पोस्टनं खळबळ )
घटस्फोट झाला तर काय सांगतो कायदा?
कायदेतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिकच्या आईच्या नावावर अर्धी संपत्ती नसली तरी घटस्फोटानंतर हार्दिकची अर्धी संपत्ती कायद्यानुसार नताशाला मिळू शकत नाही. घटस्फोट झाला तर पत्नीला भरण-पोषणाची (स्वत: आणि मूल) रक्कम मिळण्याचा अधिकार आहे. पण, ही रक्कम किती असेल हे कोर्ट निश्चित करेल.
रस्त्यावर कोण येणार?
नताशाच्या एका इन्स्टाग्राम पोस्टनं घटस्फोटांच्या चर्चेत खळबळ उडवून दिली होती. 'कुणीतरी रस्त्यावर येणार आहे,' अशी पोस्ट नताशाना केली होती. नताशानं त्या पोस्टमध्ये कुणाचंही नाव घेतलेलं नाही, पण तिनं कुणासाठी हे शब्द वापरलेत याचा अंदाज सध्या सर्वजण लावत आहेत.