जाहिरात

Natasha Stankovic : 'कुणीतरी रस्त्यावर...' घटस्फोटाच्या चर्चेत हार्दिकच्या पत्नीच्या पोस्टनं खळबळ

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक (Natasha Stankovic) यांच्यातील घटस्फोटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

Natasha Stankovic : 'कुणीतरी रस्त्यावर...' घटस्फोटाच्या चर्चेत हार्दिकच्या पत्नीच्या पोस्टनं खळबळ
Hardik Pandya and Natasa Stankovic
मुंबई:

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक यांच्यातील घटस्फोटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या विषयावर दोघांकडूनही अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. हार्दिकच्या संपत्तीमधील 70 टक्के वाटा नताशाला मिळणार अशी देखील एक सोशल मीडियावर जोरदार अफवा आहे. या अफवांमध्ये नताशानं शनिवारी इन्स्टाग्रामवर केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नताशानं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ड्रायव्हिंग स्कुलच्या साईन बोर्डचा एक चार्ट लावलाय. त्या चार्टवर 'कुणीतरी रस्त्यावर येणार आहे,' असं कॅप्शन दिलंय. हार्दिक आणि नताशा यांच्या यांच्याबाबत गेल्या काही दिवसांमध्ये अनेक अफवा पसरल्या आहेत. या दोघांनी मे 2020 मध्ये लग्न केलं होतं. त्यांना अगस्त्य हा तीन वर्षांचा मुलगा आहे. 

Latest and Breaking News on NDTV

नताशनं तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन पांड्या हे आडनाव हटवल्यानं ही चर्चा सुरु झाली. या चर्चांमध्येच रेडिटवर 'हार्दिक आणि नताशा विभक्त झाले' हे शीर्षक असलेली पोस्ट व्हायरल झाली. सोशल मीडियावरील काही युझर्सनी आयपीएल 2024 दरम्यान नताशाच्या अनुपस्थितीवरही प्रश्न उपस्थित केला आहे. नताशानं गेल्या काही दिवसांमध्ये हार्दिकसोबत एकही फोटो पोस्ट केला नसल्याचं त्यांनी सांगितलं.  


( नक्की वाचा : T20 World Cup : रोहित आणि आगरकरच्या मनाविरुद्ध झाली हार्दिक पांड्याची निवड! )

नताशाचा 4 मार्च रोजी वाढदिवस होता. त्या दिवशी हार्दिकनं काहीही पोस्ट केलं नाही, असा दावा एका पोस्टमध्ये करण्यात आालाय. हार्दिक आणि नताशानं याबाबत अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसल्यानं सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: