Champions Trophy 2025, IND vs NZ : ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाची पुढील मॅच न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. भारतानं यापूर्वीच बांगलादेश आणि पाकिस्तानचा पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे साखळी फेरीतील न्यूझीलंड विरुद्ध होणारा सामना ही भारतासाठी औपचारिकता आहे. त्यामुळे या मॅचमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला विश्रांती देण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'इंडियन एक्स्प्रेस'नं दिलेल्या वृत्तानुसार रोहित शर्माचे स्नायू दुखावले आहेत. त्यामुळे या लढतीत रोहितला विश्रांती देण्याचा टीम मॅनेजमेंट विचार करत आहे. सेमी फायनलसाठी कोणताही धोका नको म्हणून न्यूझीलंडविरुद्ध रोहितला विश्रांती दिली जाऊ शकते. तसं झालं तर व्हाईस कॅप्टन शुबमन गिल टीम इंडियाचं नेतृत्त्व करेल.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात रोहित शर्माला दुखापत झाली होती. त्या मॅचमध्ये रोहितच्या अनुपस्थितीत गिलनं टीमचं नेतृत्त्व केलं होतं. अर्थात काही वेळानं रोहित मैदानात परतला. पण, तो 100 टक्के फिट नव्हता.
( नक्की वाचा : Champions Trophy : अफगाणिस्तानच्या खेळाडूची इंग्लंडविरुद्ध सेंच्युरी, पण पाकिस्तानची होतीय थट्टा! )
याबाबत मिळालेल्या वृत्तानुसार बुधवारी झालेल्या सरावात रोहित शर्मा आणि शुबमन गिल दोघंही सहभागी झाले नव्हते. रोहित दुखापतग्रस्त आहे. तर गिलला बरं वाटत नव्हतं. पण,गुरुवारच्या सराव सत्रात गिल सहभागी झाला होता. त्यामुळे भारतीय फॅन्सना दिलासा मिळाला आहे.
कोण घेणार रोहितची जागा?
न्यूझीलंडविरुद्ध रोहित शर्माला विश्रांती दिली तर विकेट किपर ऋषभ पंतला अंतिम 11 मध्ये जागा मिळू शकते. त्या परिस्थितीमध्ये केएल राहुल गिलसोबत ओपनिंग करेल. टीम इंडियामध्ये कोणताही बॅकअप ओपनर नाही. यापूर्वी यशस्वी जैस्वालची निवड करण्यात आली होती. पण, अंतिम यादीत त्याला वगळून स्पिनर वरुण चक्रवर्तीची निवड करण्यात आली.