Champions Trophy 2025: एकीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आणखी एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत आहे. आज न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही भारतीय संघ विजयी होईल, अशी शक्यता असतानाच भारतीय क्रिकेट संघाचे सदस्य असलेल्या व्यक्तीवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आईचे निधन झाल्याने त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा सोडून मायदेशी परतावे लागणार आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एकीकडे, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीत थाटात प्रवेश केला आहे. अशातच टीम इंडियाच्या एका सदस्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापक आर. देवराज यांच्या आईचे दुखःद निधन झाले आहे. आईच्या निधनानंतर देवराज यांना चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या मध्यातच संघ सोडावा लागला.
रविवारी आईच्या निधनाची बातमी मिळताच आर देवराज हैदराबादला रवाना झाले. हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (HCA) चे सचिव देवराज दुबईमध्ये भारतीय संघासोबत होते. त्यांच्या आईच्या मृत्यूबाबत हैदराबाद क्रिकेट असोशिएशनने माहिती दिली आहे. आम्हाला कळवताना खूप दुःख होत आहे की आमचे सचिव देवराज यांच्या आई कमलेश्वरी गरू यांचे निधन झाले आहे. त्याच्या आत्म्याला शांती लाभो. देवराज गरू आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती आमच्या मनःपूर्वक संवेदना.. असं या शोकसंदेशात म्हटले आहे.
IND Vs NZ: टीम इंडियाची विजयी हॅट्रिक! न्यूझीलंडचा 44 धावांनी धुव्वा; वरुण चक्रवर्ती ठरला हिरो
दरम्यान चॅम्पियन्स स्पर्धेमध्ये भारताने प्रथम बांगलादेशला हरवले आणि नंतर पाकिस्तानला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारत आपले सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळत आहे. आज न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा सामना होत असून या सामन्यातही टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला, भारतीय गोलंदाजांच्या फिरकीपुढे किवींची दाणादाण झाली अन् टीम इंडियाने सामन्यात यशस्वी पुनरागमन करत 44 धावांनी विजय मिळवला.
टीम इंडियाने दिलेल्या 250 धावांचे आव्हान पूर्ण करताना न्यूझीलंडचा संघ अवघ्या 205 धावांवर सर्वबाद झाला. भारतीय संघाकडून वरुण चक्रवतीने सर्वाधिक पाच बळी घेतले अन् तो सामन्याचा हिरो ठरला. या विजयासोबत आता टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरोधात सामना खेळेल.