Champions Trophy 2025, Team India : 19 फेब्रुवारीपासून होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया जाहीर झाली आहे. मुंबईत झालेल्या निवड समितीच्या बैठकीनंतर ही टीम जाहीर करण्यात आली आहे. तब्बल आठ वर्षांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होणार आहे. अव्वल 8 टीममध्ये ही स्पर्धा होणार असून भारतीय टीम स्पर्धेतील सर्व सामने दुबईत खेळणार आहे.
टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून रोहित शर्मावर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आला आहे. रोहितच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं वन-डे वर्ल्ड कप 2023 मध्ये फायनलपर्यंत धडक मारली होती. तर मागच्या वर्षी झालेल्या T20 वर्ल्ड कप स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं होतं.
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये पराभव झाल्यानंतर रोहितच्या कॅप्टनसीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. पण, निवड समितीनं आयसीसीच्या या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा अनुभवी रोहितवर विश्वास दाखवला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल (व्हाईस कॅप्टन), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड यांचा एका गटात समावेश करण्यात आला आहे. भारताचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध 20 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाचं वेळापत्रक
भारत विरुद्ध बांगलादेश - 20 फ्रेब्रुवारी - दुबई
भारत विरुद्ध पाकिस्तान - 23 फेब्रुवारी - दुबई
भारत विरुद्ध न्यूझीलंड - 2 मार्च - दुबई
( नक्की वाचा : Champions Trophy 2025 : भारत - पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीत 'या' तारखेला भिडणार, वाचा संपूर्ण वेळापत्रक)
भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजसाठी टीम इंडिया जाहीर
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणाऱ्या वन-डे सीरिजसाठी देखील टीम इंडियाची घोषणा निवड समितीनं केली आहे.
रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, यशस्वी जायसवाल, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, संजू सॅमसन, नितीश रेड्डी, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी