Mohammed Shami: मोहम्मद शमीसारखं कुणी नाही, जग 'या' रेकॉर्डसाठी ठेवणार लक्षात

India vs Bangladesh, Mohammed Shami : भारतीय क्रिकेट टीमचा स्टार बॉलर मोहम्मद शमीनं इतिहास रचला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
IND vs BAN : मोहम्मद शमीनं मिचेल स्टार्कला मागं टाकलं आहे.
मुंबई:

India vs Bangladesh, Mohammed Shami : भारतीय क्रिकेट टीमचा स्टार बॉलर मोहम्मद शमीनं इतिहास रचला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (ICC Champions Trophy) भारत विरुद्ध बांगलादेश (IND vs BAN Live Score) मॅच सुरु आहे. या मॅचमध्ये त्यानं पाच विकेट्स घेत बांगला टीमचं कंबरडं मोडलं. त्याचबरोबर एक महत्त्वाचा रेकॉर्ड देखील केला.

शमी वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी बॉलमध्ये 200 विकेट्स घेणारा पहिला बॉलर बनला आहे. त्यानं ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला मागे टाकत हा रेकॉर्ड केला. स्टार्कनं 5240 बॉलमध्ये 200 विकेट्स घेतल्या. तर शमीनं हा टप्पा  5126 बॉलमध्ये पूर्ण केला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

वन-डे क्रिकेटमध्ये वेगवान 200 विकेट्स घेणारे बॉलर 

5126 बॉल - मोहम्मद शमी - भारत 
5240 बॉल - मिचेल स्टार्क - ऑस्ट्रेलिया 
5441 बॉल - सकलेल मुश्ताक - पाकिस्तान 
5640 बॉल - ब्रेट ली - ऑस्ट्रेलिया 
5783 बॉल - ट्रेंट बोल्ट - न्यूजीलंड

इतकंच नाही तर शमी वन-डे क्रिकेटमध्ये 200 विकेट्स घेणारा आठवा भारतीय बॉलर बनला. त्यानं 104 मॅच आणि 103 इनिंगमध्ये हा टप्पा गाठला. शमीनं या प्रवासात एका मॅचमध्ये सहा वेळा पाच तर 10 वेळा चार विकेट्स घेतल्या.  

Advertisement

( नक्की वाचा : IND vs BAN: अक्षर पटेल कधीही विसरणार नाही रोहितची चूक, कॅप्टननं हात जोडत मागितली माफी! Video )

वन-डे क्रिकेटमधील भारताचे टॉप टेन बॉलर

334 विकेट्स - अनिल कुंबले 
315 विकेट्स - जवागल श्रीनाथ
288 विकेट्स - अजित आगरकर
269 विकेट्स - झहीर खान 
265 विकेट्स - हरभजन सिंह 
253 विकेट्स - कपिल देव 
226 विकेट्स - रविंद्र जडेजा 
200 विकेट्स - मोहम्मद शमी 
196 विकेट्स - व्यंकटेश प्रसाद
174 विकेट्स - कुलदीप यादव 

शमीला गवसला सूर

मोहम्मद शमी 2023 साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कपनंतर दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर होता. त्यानं यावर्षी इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये टीममध्ये पुनरागमन केलं. त्या सीरिजमध्ये शमी पूर्ण सर्व मॅच खेळला नाही. त्याला फारसा प्रभावही पाडता आला नव्हता.

Advertisement

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच मॅचमध्ये पाच विकेट्स घेत शमीनं आपण फॉर्मात परतल्याचं दाखवून दिलंय. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टीममध्ये नाही. बुमराहच्या अनुपस्थितीमध्ये शमीला गवसलेला सूर टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे. 
 

Topics mentioned in this article