जाहिरात

IND vs BAN: अक्षर पटेल कधीही विसरणार नाही रोहितची चूक, कॅप्टननं हात जोडत मागितली माफी! Video

India vs Bangladesh Live : बांगलादेशची सुरुवात खराब झाली. पण, टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) केलेली एक चूक चर्चेचा विषय बनली आहे. 

IND vs BAN: अक्षर पटेल कधीही विसरणार नाही रोहितची चूक, कॅप्टननं हात जोडत मागितली माफी! Video
मुंबई:

Rohit Sharma Reaction After Dropped Hat-trick Catch IND vs BAN: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील दुसरी मॅच भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात होत आहे. टीम इंडियाचा हा पहिलाच सामना आहे. या मॅचमध्ये बांगलादेशचा कॅप्टन नजमुल हुसेन शांतोनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशची सुरुवात खराब झाली. त्यांची निम्मी टीम झटपट आऊट झाली. पण, टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) केलेली एक चूक चर्चेचा विषय बनली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

रोहितनं मागितली माफी

भारतानं या मॅचमध्ये दमदार सुरुवात केली. अनुभवी मोहम्मद शमीनं दोन विकेट्स घेतल्या. नवोदीत हर्षित राणानं नजमुल शांतोला आऊट केलं. त्यानंतर रोहितनं अक्षरकडं बॉल सोपवला. अक्षरनं खेळाचं चित्रच बदललं.

अक्षरननं नवव्या ओव्हरमध्ये दोन बॉलवर दोन विकेट घेत बांगलादेशला गुडघे टेकायला लावले. अक्षरकडं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये हॅटट्रिक करण्याची मोठी संधी होती. पण, कॅप्टन रोहित शर्माच्या चुकीमुळे ती पूर्ण झाली नाही. 

( नक्की वाचा : Champions Trophy : यजमान पाकिस्तानचा पहिल्याच मॅचमध्ये दणदणीत पराभव, स्पर्धेतून होणार लवकर पॅकअप? )
 

अक्षर पटेल त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये हॅटट्रिकवर होता. पण रोहितनं स्लिपमध्ये सोपा कॅच सोडला. अक्षरनं त्याच्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर तन्झिद हसनला (25) आऊट केलं. पुढच्याच बॉलवर अनुभवी मुशफिकुर रहीमला (0) परत पाठवलं. त्यानंतरच्या बॉलवर जाकेर अली देखील आऊट झाला असता पण, रोहितनं त्याचा सोपा कॅच सोडला.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्याच ओव्हरमध्ये हॅटट्रिक घेण्याचा रेकॉर्ड करण्याची संधी अक्षरला होती. पण, तसं झालं नाही. रोहितनं देखील त्याची चूक मान्य करत तातडीनं हात जोडत अक्षरची माफी मागितली.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील एकमेव हॅटट्रिक जेरोम टेलरच्या नावावर आहे. त्यानं 2006 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या मॅचमध्ये हा पराक्रम केला होता.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: