Pakistan Cricketer :'तो तर खुनी आहे'; पाकिस्तानच्या स्टार क्रिकेटरवर माजी पत्नीचे अंगावर काटा आणणारे आरोप

Imad Wasim Marriage Controversy:  पाकिस्तानचा माजी ऑलराउंडर इमाद वसीम सध्या मोठ्या वादात सापडलाय. इमादवर त्याच्याच माजी पत्नीने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
Imad Wasim Marriage Controversy:  सानियाने इमादवर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत.
मुंबई:

Imad Wasim Marriage Controversy:  पाकिस्तानचा माजी ऑलराउंडर इमाद वसीम सध्या मोठ्या वादात सापडलाय. इमादवर त्याच्याच माजी पत्नीने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. सानिया अश्फाक हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून इमादवर फसवणूक, धमकावणे आणि अगदी खुनासारखे गंभीर आरोप लावत खळबळ उडवून दिली आहे. इमादने नुकतेच नायला राजासोबत दुसरे लग्न केले आहे, त्यानंतर सानियाने त्याच्याविरोधात मोर्चा उघडला असून या प्रकरणामुळे क्रिकेट विश्वात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

माजी पत्नीचा इमादवर खुनाचा आरोप

सानियाने इन्स्टाग्रामवर काही पोस्ट शेअर केल्या असून त्यामध्ये तिने इमादवर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. सानियाच्या दाव्यानुसार, इमादने 2023 मध्ये तिला जबरदस्तीने गर्भपात करायला लावला होता, ज्याचा उल्लेख तिने थेट खून असा केला आहे. इतकेच नाही तर जेव्हा ती त्यांच्या तिसऱ्या बाळाला जन्म देणार होती, तेव्हा इमादने तिला एकटे सोडून दिले आणि तिची फसवणूक केली. सानियाने असेही म्हटले आहे की तिच्याकडे या सर्व गोष्टींचे व्हिडिओ पुरावे असून इमादने तिच्याशी प्रतारणा केली आहे.

( नक्की वाचा : Ishan Kishan: आधी पाकिस्तानचा गेम केला अन् आता थेट लग्नाची चर्चा; आजोबांच्या घोषणेनंतर आईनं दिलं नेमकं उत्तर )
 

व्हॉट्सअ‍ॅप चॅट आणि धमकावल्याचा दावा

या वादात सानियाने जुलै 2025 मधील काही व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सचे स्क्रीनशॉट देखील व्हायरल केले आहेत. या चॅट्समध्ये इमाद तिला कायदेशीर कारवाई करण्याची आणि पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देताना दिसत आहे. सानिया गरोदर असताना तिने इमादला डिलिव्हरीच्या वेळी सोबत राहण्याची विनंती केली होती, मात्र इमादने तिला आणि त्याच्या कुटुंबाला संपर्क न करण्याची तंबी दिली होती. जर तिने ऐकले नाही तर पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्याने दिला होता.

Advertisement

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे धाव 

सानियाने या प्रकरणात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. नुकत्याच झालेल्या पीएसएल लिलावात इस्लामाबाद युनायटेडने इमादला 2.2 कोटी रुपये देऊन आपल्या संघात घेतले आहे. अशा चारित्र्यहीन खेळाडूला संघात स्थान दिल्याबद्दल सानियाने चाहत्यांना पीएसएलच्या या फ्रँचायझीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. या गंभीर आरोपांमुळे इमादच्या क्रिकेट करिअरवरही प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.

इमाद वसीमचे स्पष्टीकरण काय?

इमाद आणि सानियाचे लग्न 2019 मध्ये झाले होते, परंतु गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या संपूर्ण प्रकरणावर इमादने एक सविस्तर पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे. त्याने सानियासोबतचे लग्न हे त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रकरण असल्याचे म्हटले आहे. या नात्यातून मिळालेली मुले ही आपल्यासाठी मोठी देणगी असून त्यांच्यावर आपले नेहमीच प्रेम राहील, असे त्याने स्पष्ट केले. तसेच, आपण हे नाते वाचवण्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त वेळ दिला, ज्याचा आता आपल्याला पश्चात्ताप होत असल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे.
 

Advertisement