IND vs ENG : U19 टीमनं घेतला बदला, 50 ओव्हरमध्ये ठोकले 442 रन्स! ट्रक ड्रायव्हरच्या मुलाची वादळी सेंच्युरी

IND Under-19 vs Young Lions: टीम इंडियाच्या अंडर-19 टीमनं 50 ओव्हर्समध्ये 9 आऊट 442 रन्सचा डोंगर उभा करत सर्वांना चकीत केलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
India U19 Team : भारताच्या अंडर 19 टीममध्ये इंग्लंडमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे.
मुंबई:

IND Under-19 vs Young Lions: टीम इंडियाच्या सीनियर टीमनं निराशाजनक कामगिरी करत लीड्स टेस्ट पाच विकेट्सनं गमावली. पण, त्याचवेळी अंडर-19 टीमनं 50 ओव्हर्समध्ये 9 आऊट 442 रन्सचा डोंगर उभा करत सर्वांना चकीत केलं. हा सामना भारताच्या अंडर-19 टीमनं 231 रन्सनं जिंकला. 412 रन्सचा पाठलाग करताना यंग लायन्स इनविटेशनल XI ची टीम 211 रन्सवरच ऑल आऊट झाली. (Tour Match, Loughborough, June 24, 2025, India Under-19s tour of England)

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

18 वर्षांच्या हरवंश पंगालियाची सेंच्युरी 

टीम इंडियाच्या अंडर-19 टीमकडून हरवंश पंगालियानं फक्त 52 बॉलमध्ये नाबाद 103 रन्स काढले. या खेळीत त्यानं 8 फोर आणि 9 सिक्स लगावले. तसेच राहुल कुमारनं 60 बॉलमध्ये 73 रन्स काढले.  तर, कनिष्क चौहानने 67 बॉलमध्ये 79 रन्सची खेळी केली. याशिवाय, आर.एस. अंबरीशने 47 बॉलमध्ये झटपट 72 रन काढले. 

आयपीएल स्पर्धा गाजवणारा 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीनं 13 बॉलमध्ये 17 रन काढले. तर आयुष म्हात्रेला फक्त 1 रनच काढता आला. पण, इतर तरुण बॅटर्सनी वादळी खेळी करत जगाला आश्चर्यचकित केले. 

( नक्की वाचा : IND vs ENG : 'कर्म कधीच माफ करत नाही' टीम इंडियातून वगळलेल्या खेळाडूचा हेड कोच गंभीरवर निशाणा? )
 

अंडर 19 टीमच्या बॅटर्सप्रमाणे बॉलर्सनी दमदार कामगिरी केली.  दीपेश देवेंद्रनने तीन तर नमन पुष्पक आणि विहान मल्होत्रा ​​यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले. 

Advertisement

कोण आहे हरवंश पंगालिया?

नकुल अयाची यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली नीलकंठ क्रिकेट अकादमीमध्ये क्रिकेटचा प्रवास सुरू करणारा हरवंश पंगालिया हा विकेटकिपर-बॅटर आहे. पंगालियाने पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण गुजरातमधील डीपीएस गांधीधाममध्ये घेतले. हरवंश यापूर्वी स्पटेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 टीमविरुद्धही खेळला होता.  

हरवंशचे वडील ट्रक ड्रायव्हर

भारतीय अंडर-19 टीमचा विकेटकिपर-बॅटर असलेल्या हरवंशवर त्याच्या वडिल आणि काकाचा मोठा प्रभाव आहे. त्याने वडील दमनदीप सिंग आणि काका कुंवरजीत सिंग यांना त्यांच्या शहरात क्रिकेट खेळताना पाहिले. विशेष म्हणजे, ते दोघेही विकेटकिपर होते. आता हरवंशचे कुटुंब कॅनडामध्ये स्थायिक झाले आहे, जिथे त्याचे वडील ब्रॅम्पटनमध्ये ट्रक ड्रायव्हर आहेत. 
 

Advertisement
Topics mentioned in this article