India vs Australia Live Streaming: How To Watch IND vs AUS 1st T20 Live On TV And Online?: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनंतर आता भारतीय क्रिकेट संघ T20I मालिकेसाठी सज्ज झाला आहे. 2-1 ने एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर, भारताचा युवा संघ T20I मालिकेत बदला घेण्यासाठी उत्सुक असेल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आणि मिचेल मार्शच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची T20I मालिका बुधवार, 29 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे.
वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारखे अनुभवी खेळाडू होते, पण T20I मालिकेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील युवा खेळाडूंचा संघ ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत आव्हान देणार आहे. भारत सध्या T20I क्रमवारीत जगातील नंबर 1 संघ आहे आणि नुकताच त्यांनी T20 फॉरमॅटमधील आशिया चषक 2025 जिंकला आहे. तसेच, टीम इंडिया गतविजेती विश्वविजेती देखील आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया संघ क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे, ज्यामुळे ही मालिका अत्यंत रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांसारख्या आक्रमक खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळेल.
(नक्की वाचा : Virat Kohli: 305 वनडेमध्ये विराट कोहलीची पहिल्यांदाच दिसली 'ती' स्माईल, गावस्करांची भविष्यवाणी खरी ठरणार?)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या सामान्याची सर्व माहिती (India vs Australia Live Streaming Details)
पहिला T20I सामना:
तारीख: बुधवार, 29 ऑक्टोबर
वेळ (भारतीय वेळेनुसार): दुपारी 1.45 वाजता (IST)
स्थळ: मनुका ओव्हल, कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया (Manuka Oval, Canberra)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची T20I मालिका भारतात कुठे पाहता येईल? (IND vs AUS Live Telecast: Where To Watch India National Cricket Team vs Australian Men's Cricket Team)
IND vs AUS लाईव्ह स्ट्रीमिंग: जिओ हॉटस्टार (JioHotstar) ॲप आणि वेबसाइटवर.
IND vs AUS टीव्हीवर थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स (Star Sports) नेटवर्कच्या वाहिन्यांवर.
संपूर्ण T20I मालिकेचे वेळापत्रक (Schedule)
पहिली T20I -29 ऑक्टोबर- मनुका ओव्हल, कॅनबेरा (Manuka Oval, Canberra)
दुसरी T20I -31 ऑक्टोबर-मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड -मेलबर्न (MCG, Melbourne)
तिसरी T20I - 2 नोव्हेंबर-बेलेरिव्ह ओव्हल, होबार्ट (Bellerive Oval, Hobart)
चौथी T20I - 6 नोव्हेंबर- गोल्ड कोस्ट स्टेडियम, गोल्ड कोस्ट (Gold Coast Stadium, Gold Coast)
पाचवी T20I -8 नोव्हेंबर -द गब्बा - ब्रिस्बेन (The Gabba, Brisbane)
भारत आणि ऑस्ट्रेलिया टीम ( India vs Australia T20I series squads )
भारतीय संघ (India Squad)
सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकिपर), शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, जितेश शर्मा
ऑस्ट्रेलिया संघ (Australia Squad)
मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, टीम डेव्हिड, जोश इंग्लिस (विकेटकिपर), मार्कस स्टोइनिस, मिचेल ओवेन, झेवियर बार्टलेट, शॉन ॲबॉट, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवूड, जोश फिलिप, नॅथन एलिस, तन्वीर संघा, बेन द्वारशुइस