Gautam Gambhir on dressing room controversy : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या सीरिजमधील पाचवी आणि शेवटची टेस्ट शुक्रवारपासून (3 जानेवारी) सिडनीमध्ये सुरु होत आहे. या टेस्टपूर्वी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील चर्चांचं वृत्त माध्यमांंमध्ये प्रसिद्ध झालं होतं., या वृत्तावर गंभीरनं नाराजी व्यक्त केली आहे. खेळाडू आणि कोचमधील चर्चा मीडियामध्ये लीक होत आहे, ही चांगली गोष्ट नसल्याचं गंभीरनं सिडनीतील पत्रकार परिषदेत सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गंभीर नाराज असल्याचं आलं होतं वृत्त
मेलबर्न टेस्टमध्ये झालेल्या मोठ्या पराभवानंतर गौतम गंभीर खेळाडूंवर नाराज असल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. त्यानं ड्रेसिंग रुममधील बैठकीत खेळाडूंना 'आता खूप झालं' या शब्दात तंबी दिली. तसंच टीमच्या रणनितीनुसार खेळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली, असा दावा या वृत्तामध्ये करण्यात आला होता.
काय म्हणाला गंभीर?
पाचव्या टेस्टपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत गंभीर म्हणाला की, 'कोच आणि खेळाडूंमधील चर्चा ड्रेसिंग रुमपर्यंतच मर्यादीत राहिली पाहिजे. ड्रेसिंग रुममध्ये प्रामाणिक लोकं असतील तोपर्यंतच भारतीय क्रिकेट सुरक्षित हातामध्ये आहे, असं गंभीरनं सांगितलं. तुमची कामगिरी या एकाच निकषावर तुम्ही टीममध्ये राहू शकता. संघ भावना सर्वात महत्त्वाची आहे. खेळाडू त्यांचा नैसर्गिक खेळ खेळू शकतात. पण, सांघिक खेळात ते फक्त टीमसाठी योगदान देत असतात,' असं गंभीरनं स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : IND vs AUS: आणखी एक ड्रामा, 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा कॅप्टन? कोण आहे 'Mr. Fix-It'? )
रोहित-विराटची शेवटची टेस्ट?
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे टीम इंडियाचे सर्वात सिनिअर खेळाडू सिडनीमध्ये शेवटची टेस्ट खेळणार ही सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या पत्रकार परिषदेत गंभीरला तो प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी गंभीर म्हणाला की, 'रोहित आणि विराटबरोबर फक्त पुढची टेस्ट जिंकण्याबाबत चर्चा झाली. कारण, पुढची टेस्ट जिंकणे किती आवश्यक आहे, हे त्यांना माहिती आहे.
फास्ट बॉलर आकाश दीप सिडनी टेस्ट खेळणार नाही, हे गंभीरनं यावेळी जाहीर केलं. आकाश सध्या पाठदुखीनं त्रस्त आहे. त्याच्या जागेवर कोण खेळणार याबाबतची घोषणा त्यानं केली नाही.