Suryakumar Records : सूर्यकुमार दुसऱ्या टी-20 सामन्यात 4 मोठे विक्रम नावावर करणार?

Suryakumar Records : सूर्याने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 4 शतके झळकावली आहेत. भारतीय T20 कर्णधार सूर्याने आतापर्यंत T20I मध्ये इंग्लंडविरुद्ध एक, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक, श्रीलंकेविरुद्ध एक आणि न्यूझीलंडविरुद्ध एक शतक झळकावले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार 4 विक्रम करण्याच्या जवळ आहे . मालिकेतील दुसरा टी-20 सामना चेन्नईत खेळवला जाणार आहे . जर सूर्या इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान शतक झळकावण्यात यशस्वी ठरला, तर इंग्लंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन शतके झळकावणारा तो जगातील एकमेव फलंदाज ठरेल. 

सूर्याने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 4 शतके झळकावली आहेत. भारतीय T20 कर्णधार सूर्याने आतापर्यंत T20I मध्ये इंग्लंडविरुद्ध एक, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक, श्रीलंकेविरुद्ध एक आणि न्यूझीलंडविरुद्ध एक शतक झळकावले आहे. 

T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक शतके 

  • सूर्यकुमार यादव - 1 
  • रोहित शर्मा - 1 
  • बाबर आझम - 1 

150 षटकार पूर्ण करण्यापासून 5 षटकार दूर

सूर्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 षटकार पूर्ण करण्यापासून केवळ 5 षटकार दूर आहे. जर सूर्या हे करण्यात यशस्वी ठरला तर तो T20I मध्ये 150 हून अधिक षटकार मारणारा भारताचा दुसरा फलंदाज ठरेल. सध्या रोहित शर्मा T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 205 षटकार ठोकणारा फलंदाज आहे. म्हणजेच, 150 षटकार पूर्ण करून, सूर्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 150 हून अधिक षटकार मारणारा भारताचा दुसरा आणि जागतिक क्रिकेटमधील चौथा फलंदाज बनेल. 

T-20 मध्ये 350 षटकार मारण्याच्या जवळपास

याशिवाय सूर्या टी-20 क्रिकेटमध्ये एकूण 350 षटकार पूर्ण करण्यापासून 9 षटकार दूर आहे. आतापर्यंत सूर्याने 305 सामन्यांच्या 281 डावांमध्ये 341 षटकार मारले आहेत. त्याचवेळी तो आणखी 9 षटकार मारण्यात यशस्वी ठरला तर टी-20 मध्ये 350 षटकार मारणारा तो भारताचा तिसरा फलंदाज ठरेल. आतापर्यंत T-20 मध्ये 350 किंवा त्याहून अधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या नावावर आहे. 

Advertisement

8000 T-20 धावा करण्याच्या जवळ

सूर्यकुमार यादव T20 क्रिकेटमध्ये 8000 धावा पूर्ण करण्याच्या जवळ आहे. सूर्याने आतापर्यंत T-20 मध्ये 305 सामन्यांच्या 281 डावांमध्ये 7875 धावा केल्या आहेत. म्हणजेच 125 धावा केल्यानंतर सूर्या T-20 मध्ये 8000 धावा पूर्ण करेल. आतापर्यंत विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन आणि सुरेश रैना यांनी टी-20 मध्ये भारतासाठी 8000 धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा सूर्या हा पाचवा भारतीय फलंदाज ठरू शकतो.