IND vs NZ : बार्बाडोसनंतर आता अहमदाबाद! रोहितची 'ती' परंपरा सूर्यानेही जपली; ऐतिहासिक प्रसंगाचा पाहा Video

IND vs NZ T20 World Cup Final 2026:  सूर्यकुमार यादवनं विजयानंतर जे केलं त्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवचा इमोशनल व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
मुंबई:

IND vs NZ T20 World Cup Final 2026:  अहमदाबादच्या ऐतिहासिक मैदानावर भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा तिरंगा फडकवला आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करत भारताने विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव कमालीचा भावूक झाला होता. 

विजयाचा आनंद साजरा करत असताना सूर्याने मैदानाच्या मध्यभागी जाऊन खेळपट्टीची माती आपल्या कपाळाला लावली. त्याच्या या कृत्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून फॅन्सच्या  डोळ्यांतही आनंदाश्रू उभे राहिले आहेत.

सूर्यानं नेमकं काय केलं?

भारताने रविवारी झालेल्या T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये न्यूझीलंडवर 96 रनने विजय मिळवला. विजय निश्चित झाल्यानंतर सूर्यकुमार यादव खेळपट्टीकडे चालत गेला. त्याने मोठ्या आदराने जमिनीला स्पर्श केला आणि तिथली माती उचलून आपल्या कपाळाला लावली. मैदानावरील आणि खेळपट्टीवरील त्याचे हे प्रेम पाहून स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. या विजयासाठी आणि मैदानाने दिलेल्या साथीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सूर्याचा अनोखा अंदाज सर्वांनाच भावला आहे.

( नक्की वाचा : IND vs NZ : शून्यावर आऊट होऊनही सूर्याने असा पलटवला सामना; भारताने न्यूझीलंडला कसं हरवलं? वाचा सविस्तर! )

रोहित शर्माच्या आठवणींना उजाळा

सूर्यकुमार यादवने केलेली ही कृती पाहून अनेकांना 2024 मधील रोहित शर्माच्या त्या ऐतिहासिक क्षणाची आठवण झाली. त्या वेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहितने बार्बाडोसच्या खेळपट्टीला नमन केले होते आणि तिथली माती चाखली होती. रोहितनंतर आता सूर्यानेही तशाच प्रकारे मैदानाचा आदर राखून चाहत्यांची मने जिंकली आहेत. भारतीय कर्णधारांची ही परंपरा आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Advertisement

भारतीय बॅटर्सची जोरदार आतषबाजी

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियानं सुरुवातीपासूनच न्यूझीलंडवर वर्चस्व गाजवलं. भारताने पॉवर प्लेमध्येच तब्बल 92 रन कुटले होते. अभिषेक शर्माने तुफानी फलंदाजी करत 52 रनची खेळी केली, तर संजू सॅमसनने मैदानाच्या चोहोबाजूला फटकेबाजी करत 89 रन चोपले. इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये शिवम दुबेने 24 रन वसूल करत भारताला 255 या डोंगरासारख्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

( नक्की वाचा : Sanju Samson चा 'देवमाणूस' सचिन तेंडुलकर! बॅट चालत नव्हती तेव्हा देवानेच दिला आधार; भावूक संजूनं सारं सांगितलं )

बॉलर्सचा दबदबा

256 रनच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात अत्यंत संथ झाली. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर त्यांचे बॅटर तग धरू शकले नाहीत. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या धारदार गोलंदाजीने न्यूझीलंडचे कंबरडे मोडले. त्याने या सामन्यात 4 विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडचा पूर्ण डाव 19 ओव्हरमध्ये केवळ 159 रनवर आटोपला. या मोठ्या विजयासह भारताने टी-20 क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

Advertisement

इथे पाहा संपूर्ण VIDEO

Topics mentioned in this article