IND vs NZ T20 World Cup Final 2026: भारतानं न्यूझीलंडचा 96 रन्सनं पराभव करत T20 वर्ल्ड कप 2026 चं विजेतेपद पटकावलं आहे. टीम इंडियानं सांघिक कामगिरीच्या जोरावर हे विजेतेपद पटकावलंय. या विजेतेपदामध्ये प्रत्येक खेळाडूचं योगदान आहे. त्याचवेळी फायनल मॅचमध्ये कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या एका खास रणनितीची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
सुर्यानं फायनलमध्ये एकही रन करत आला नाही. पण, त्यानं कॅप्टन म्हणून मैदानात चोख काम केलं. न्यूझीलंडच्या दोन महत्त्वाच्या विकेट्स घेण्यात त्याचं डोकं निर्णायक ठरलं. त्यामुळेच भारताच्या विजेतेपदाचा पाया रचला गेला.
सुर्याने रचलं जाळं
न्यूझीलंडचा ओपनर फिन अॅलेन या पूर्ण स्पर्धेत जोरदार फॉर्ममध्ये होतं. सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या 33 बॉलमध्ये सेंच्युरी ठोकणाऱ्या अॅलेन रोखणं हे भारतीय बॉलरसमोरचं सर्वात मोठं चॅलेंज होतं. सूर्याने त्याची दुखती नस अचूक ओळखली आणि तिसऱ्या ओव्हरमध्येच एक मास्टरस्ट्रोक खेळला.
त्याने फास्ट बॉलरना बाजूला करून चेंडू अक्षर पटेलच्या हातात सोपवला. हा निर्णय धाडसी होता, पण अॅलेन स्पिनसमोर नेहमीच अडखळतो हे सूर्याला माहीत होतं. अक्षरच्या एका वेगवान बॉलवर मोठा शॉट मारण्याच्या नादात तो बाद झाला आणि न्यूझीलंडची दाणादाण उडाली.
( नक्की वाचा :Sanju Samson चा 'देवमाणूस' सचिन तेंडुलकर! बॅट चालत नव्हती तेव्हा देवानेच दिला आधार; भावूक संजूनं सारं सांगितलं )
बुमराह आणि अर्शदीपचा अचूक वापर
सूर्याने केवळ अक्षरच नाही तर जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंगचा ज्या पद्धतीने वापर केला, त्यामुळे कीवी बॅटरना खेळपट्टीवर पाय रोवण्याची संधीच मिळाली नाही. बुमराहला नेमकं कधी मोर्च्यावर आणायचं आणि स्लोअर डिलिव्हरीचं जाळं कसं विणायचं, यामध्ये सूर्याची कप्तानी उठून दिसली. इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलप्रमाणेच या फायनलमध्येही सूर्याने बॉलिंगमध्ये केलेले बदल प्रतिस्पर्धी टीमची रणनीती उद्ध्वस्त करणारे ठरले. विकेट जरी बॉलरच्या नावावर जमा झाल्या असल्या, तरी त्यामागचा खरा गेम प्लॅन सूर्याचा होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world