IND vs NZ : बंगळुरुमध्ये कोहलीची 'विराट' कामगिरी, टेस्ट क्रिकेटमध्ये 'हा' रेकॉर्ड करणारा चौथा भारतीय

India vs New Zealand 1st Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बंगळुरुमध्ये सुरु असलेल्या टेस्टमध्ये विराट कोहलीनं (Virat Kohli) टीमला गरज असताना उपयुक्त खेळी केली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Virat Kohli
मुंबई:

India vs New Zealand 1st Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बंगळुरुमध्ये सुरु असलेल्या टेस्टमध्ये विराट कोहलीनं (Virat Kohli) टीमला गरज असताना उपयुक्त खेळी केली. तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या बॉलवर विराट आऊट झाला. पण, त्यानं त्यापूर्वी मुंबईकर सर्फराज खानसोबत तिसऱ्या विकेटसाठी 136 रनची भागिदारी केली. या भागिदारीमुळे बंगळुरु टेस्टच्या तिसऱ्या दिवसाच्या अखेर भारतानं न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या इनिंगमध्ये तीन आऊट 231 असं चांगलं पुनरागमन केलं आहे. न्यूझीलंडनं पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियानं 336 रनची आघाडी घेतली. भारतीय क्रिकेट टीम अजूनही 125 रननं मागं आहे. त्यांच्या सात विकेट्स शिल्लक आहेत.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोहलीचा 'विराट' रेकॉर्ड

तिसरा दिवसाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये विराट कोहली 70 रनवर खेळत होता. याच स्कोअरवर तो दिवसाच्या शेवटच्या बॉलवर आऊट झाला. विराटनं 70 रन काढले. न्यूझीलंडकडून एजाज पटेलनं दोन विकेट्स घेतल्या. त्यानं रोहित शर्मा (52) आणि यशस्वी जैस्वाल (35) यांना आऊट केलं. 

विराटनं आऊट होण्यापूर्वी एक महत्त्वाचा रेकॉर्ड पूर्ण केला. विराटनं 42 व्या ओव्हरमध्ये विल्यम ओ'रुर्केच्या बॉलिंगवर एक रन करत टेस्ट क्रिकेटमध्ये स्वत:चे 9 हजार रन (Virat Kohli completes 9000 Test Runs ) पूर्ण केले. टेस्ट क्रिकेटमध्ये 9 हजार रन करणारा विराट हा चौथा भारतीय आहे.  

विराटनं 197 इनिंगमध्ये हा रेकॉर्ड केला आहे. भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करण्याचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्यानं 15921 रन केले आहे. तर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राहुल द्रविड आहे. त्यानं 13265 रन केले आहेत. या यादीमध्ये सुनील गावस्कर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 10122 रन केले आहेत. 

( नक्की वाचा : टीम इंडिया पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास जाणार? परराष्ट्र मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर मिळाला संकेत )

भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जलद 9 हजार रन करण्याचा रेकॉर्ड राहुल द्रविडच्या नावावर आहे. त्यानं 176 इनिंगमध्ये हा टप्पा पूर्ण केला. सचिननं 179 इनिंगमध्ये हा टप्पा ओलांडला. तर सुनिल गावस्करांनी 192 इनिंगमध्ये 9 हजार रन पूर्ण केले होते. 

Topics mentioned in this article