IND vs SA Match Live Updates : IND vs SA LIVE : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज सुपर 8 चा दुसरा सामना भारत आणि दक्षिणा आफ्रिका यांच्यात रंगला. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला, आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरने दमदार अर्धशतक ठोकून आफ्रिकेला समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. आफ्रिकेनं 20 षटकांमध्ये 7 विकेट्स गमावून 187 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे भारताला विजयासाठी 188 धावांचं टार्गेट होतं. परंतु, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक मारा करून भाराताच्या फलंदाजांचा स्वस्तात माघारी पाठवलं. पॉवर प्ले मध्ये भारताचे 4 फलंदाज बाद झाले. त्यानंतर आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराजने हार्दिक पंड्या, रिंकू सिंग आणि अर्शदीप सिंगला एका पाठोपाठ बाद केलं. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी 18.5 भारताचा 111 धावांवर सर्वबाद केलं. त्यामुळे आफ्रिकेचा या सामन्यात 76 धावांनी विजय झाला.
सुरुवातीच्या तीन षटकांमध्ये भारताचे तीन फलंदाज स्वस्तात माघारी परतले. इशान किशन, तिलक वर्मा आणि अभिषेक शर्माला धावांचा सूर गवसला नाही. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि वॉशिंग्टन सुंदरने मैदानात सावध खेळी केली. पण बॉशने वॉशिंग्टन सुंदरला 11 धावांवर बाद केलं. 9 षटकानंतर भारताची धावसंख्या 51-4 वर पोहोचली होती. कॉर्बिन बॉशने सूर्यकुमार यादवला 18 धावसंख्येवर बाद केलं. 12 षटकानंतर भारताची धावसंख्या 75-5 वर पोहोचली होती. शिवम दुबे आणि हार्दिक पंड्याच्या खांद्यावर भारताची कमान होती.
नक्की वाचा >> T20 World Cup 2026, IND v SA: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात दोन सख्खे भाऊ आमनेसामने, "आमच्या आईला टेन्शन.."
भारताला 54 चेंडूत 120 धावांची आवश्यकता होती. परंतु, त्यानंतर केशव महाराजने भारताला तीन मोठे धक्के दिले आणि भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या. हार्दिक पंड्या मोठा फटका मारताना झेल बाद झाला. तर त्यानंतर रिंकू सिंग शून्यावर बाद झाला. केशव महाराजने या दोन्ही फलंदाजांना बाद केलं. पंधरा षटकानंतर भारताची धावसंख्या 88-8 झाली होती. केशव महाराजने अर्शदीप सिंगलाही बाद केलं. त्यानंतर जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबेही बाद झाला. शिवम दुबेनं 37 चेंडूत 42 धावांची खेळी केली.
Ind vs Sa Live : भारताचा दारूण पराभव, आफ्रिकेचा 76 धावांनी विजय
Ind vs Sa Live :भारताला विजयासाठी 188 धावांचं टार्गेट होतं. परंतु, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक मारा करून भाराताच्या फलंदाजांचा स्वस्तात माघारी पाठवलं. पॉवर प्ले मध्ये भारताचे 4 फलंदाज बाद झाले. त्यानंतर आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराजने हार्दिक पंड्या, रिंकू सिंग आणि अर्शदीप सिंगला एका पाठोपाठ बाद केलं. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी 18.5 भारताचा 111 धावांवर सर्वबाद केलं. त्यामुळे आफ्रिकेचा या सामन्यात 76 धावांनी विजय झाला.
Ind vs Sa live : भारत पराभवाच्या छायेत, वाचा लेटेस्ट स्कोअर
भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या आहेत. हार्दिक पंड्या मोठा फटका मारताना झेल बाद झाला. तर त्यानंतर रिंकू सिंग शून्यावर बाद झाला. केशव महाराजने या दोन्ही फलंदाजांना बाद केलं. पंधरा षटकानंतर भारताची धावसंख्या 88-8 झाली आहे. केशव महाराजने अर्शदीप सिंगलाही बाद केलं. 16 षटकानंतर भारताची धावसंख्या 108-8 वर पोहोचली आहे.
Ind vs Sa Live : ड्रिंक्स ब्रेकनंतर भारताची धावसंख्या किती?
Ind vs Sa Live : भारताची धावसंख्या 14 षटकानंतर 86-5 वर पोहोचली आहे. शिवम दुबे आणि हार्दिक पंड्याच्या खांद्यावर भारताची कमान आहे. भारताला 54 चेंडूत 120 धावांची आवश्यकता आहे.
Ind vs Sa Live : भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव बाद, 11 षटकानंतर धावसंख्या किती?
Ind vs Sa Live : भारताचे एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झाल्याने धावसंख्या मंदावली आहे. कॉर्बिन बॉशने सूर्यकुमार यादवला 18 धावसंख्येवर बाद केलं. 12 षटकानंतर भारताची धावसंख्या 75-5 वर पोहोचली आहे.
Ind vs Sa Live : पॉवर प्ले मध्ये भारताची दाणादाण, 4 फलंदाज बाद
सुरुवातीच्या तीन षटकांमध्ये भारताचे तीन फलंदाज स्वस्तात माघारी परतले. इशान किशन, तिलक वर्मा आणि अभिषेक शर्माला धावांचा सूर गवसला नाही. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि वॉशिंग्टन सुंदरने मैदानात सावध खेळी केली. पण बॉशने वॉशिंग्टन सुंदरला 11 धावांवर बाद केलं. 9 षटकानंतर भारताची धावसंख्या 51-4 वर पोहोचली आहे.
Ind vs Sa Live : अभिषेक शर्मा बाद, 5 षटकानंतर भारताची धावसंख्या किती?
Ind vs Sa Live : सुरुवातीच्या दोन षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारताचे दोन फलंदाज बाद केले. एडन मार्क्रमने इशान किशनला शुन्यावर बाद केलं. त्यानंतर मार्को जान्सेननं तिलक वर्माला एका धावेवर बाद केलं. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने भारताची कमान सांभाळली. परंतु, अभिषेकला जान्सेननं 15 धावांवर बाद केलं. पाच षटकानंतर भारताची धावसंख्या 23-3 वर पोहोचली आहे.
Ind vs Sa Live : सुरुवातीच्या दोन षटकात भारताचे दोन फलंदाज बाद
दक्षिण आफ्रिकेनं भारताला विजयासाठी 188 धावांचं आव्हान दिलं आहे. या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताचे दोन स्टार फलंदाज इशान किशन आणि तिलक वर्मा स्वस्तार माघारी परतले. इशान शून्य धावांवर तर तिलक एक धावा करून बाद झाला. 3 षटकानंतर भारताची धावसंख्या 23-2 वर पोहोचली आहे.
Ind vs Sa Live : आफ्रिकेनं भारताला दिलं 188 धावांचं टार्गेट
Ind vs Sa Live : दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने 20 षटकांमध्ये 7 विकेट्स गमावून 187 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे भारताला विजयासाठी 188 धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.
Ind vs Sa Live : आफ्रिकेचे 7 फलंदाज बाद
Ind vs Sa Live : आफ्रिकेचे सात फलंदाज बाद झाले असून मैदानात स्टब्स आणि कगिसो रबाडा फलंदाजी करत आहेत. जसप्रीत बुमराहने कॉर्बिन बॉशला 5 धावांवर बाद केलं.
Ind vs Sa Live : आफ्रिकेचा स्टार फलंदाज मिलर बाद
Ind vs Sa Live : दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज डेव्हिड मिलर 63 धावांवर बाद झाला. त्याने 35 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या जोरावर 63 धावांची खेळी केली. वरूण चक्रवर्तीने त्याला बाद करत भारताला ब्रेक थ्रू दिला. 19 षटकानंतर आफ्रिकेची धावसंख्या 167-7 वर पोहोचली आहे. अर्शदीप सिंगने मार्को जान्सेनला 2 धावांवर बाद केलं.
Ind vs Sa Live : 15 षटकानंतर आफ्रिकेची धावसंख्या किती?
Ind vs Sa Live : 15 षटकानंतर आफ्रिकेची धावसंख्या 144-4 वर पोहोचली आहे. मिलर 62 धावांवर नाबाद आहे. तर ट्रिस्टन स्टब्स 10 वर नाबद खेळत आहे.
Ind vs Sa Live : डेव्हिड मिलरने अर्धशतक ठोकलं आहे. पण आफ्रिकेचा स्टार फलंदाज ब्रेव्हिस 29 चेंडूत 45 धावांवर बाद झाला. शिवम दुबेनं ब्रेव्हिसला झेलबाद केलं.
Ind vs Sa Live : दक्षिण आफ्रिका शंभरी पार, मिलरची आक्रमक फलंदाजी
Ind vs Sa Live : डेव्हिड मिलरने भारताच्या गोलंदाजांचं टेन्शन वाढवलं आहे. मिलरने दोन गगनचुंबी षटकार ठोकून मैदानात धावांचा पाऊस पाडला आहे. 12 षटकानंतर दक्षिण आफ्रिका संघाची धावसंख्या 111-3 वर पोहोचली आहे.
Ind vs Sa Live : दक्षिण आफ्रिकेच्या मिलरचा धमाका, षटकार ठोकले
Ind vs Sa Live : दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज डेव्हिड मिलर आणि ब्रेव्हिस मैदानात तग धरून आहे. तीन फलंदाज बाद झाल्यानंतर या दोन्ही फलंदाजांनी आफ्रिकेची कमान सांभाळली आहे. मिलर 21 चेंडूत 34 धावांवर खेळत आहे. तर ब्रेविस 16 चेंडूत 23 धावांवर आहे. आफ्रिकेची धावसंख्या 10 षटकानंतर 77-3 झाली आहे.
Ind vs Sa Live : आठ षटकानंतर आफ्रिकेची धावसंख्या किती?
Ind vs Sa Live : भारताने पॉवर प्ले मध्ये दमदार कामगिरी केली. पहिल्या पाच षटकांमध्ये भारताने आफ्रिकेचे तीन फलंदाज बाद केलं. त्यामुळे आफ्रिकेची धावसंख्या मंदावली. दरम्यान, आठ षटकानंतर आफ्रिकेची धावसंख्या 56-3 इतकी झाली आहे.
Ind vs Sa Live : पॉवर प्ले मध्ये आफ्रिकेची धावसंख्या किती?
Ind vs Sa Live : दक्षिण आफ्रिकेनं पॉवर प्ले मध्ये म्हणजेच सहा षटकानंतर 3 बाद 41 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. ब्रेव्हिस आणि मिलर आफ्रिकेची कमान सांभाळत आहेत. वॉश्गिंटन सुंदर पहिल्या विकेटच्या प्रतिक्षेत आहे.
Ind vs Sa Live : आफ्रिकेचे 3 फलंदाज बाद, 5 षटकानंतर धावसंख्या किती?
Ind vs Sa Live : जसप्रीत बुमराहने दुसऱ्या षटकात क्विंटन डिकॉकला बाद केलं. त्यानंतर अर्शदीप सिंगने एडन मार्करमला चार धावांवर माघारी पाठवलं. त्यानंतर बुमराहच्या गोलंदाजीवर रियान रिकल्टन 7 धावांवर बाद झाला. 5 षटकानंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 31-3 इतकी झाली आहे.
Ind vs Sa Live : डिकॉकनंतर मार्करम स्वस्तात माघारी
Ind vs Sa Live : दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीच्या तीन षटकांमध्ये दोन मोठे धक्के बसले आहेत. जसप्रीत बुमराहने क्विंटन डिकॉकला सहा धावांवर बाद केल्यावर अर्शदीप सिंगने एडन मार्करमला झेलबाद केलं. मार्करम चार धावांवर बाद झाला.
Ind vs Sa Live : दुसऱ्या षटकात आफ्रिकेला मोठा धक्का
Ind vs Sa Live :भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने दुसऱ्या षटकात क्विंटन डिकॉकला 6 धावांवर क्लिन बोल्ड केलं. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसाठी हा मोठा धक्का आहे. बुमराने भारताला ब्रेक थ्रू दिला आहे. दोन षटकानंतर आफ्रिकेची धावसंख्या 11-1 इतकी आहे.
Ind vs Sa Live : आफ्रिकेच्या पहिल्या षटकात किती धावा?
Ind vs Sa Live : दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर भारतासाठी अर्शदीप सिंगने पहिलं षटक फेकलं. आफ्रिकेनं पहिल्या षटकात बिनबाद 4 धावा केल्या आहेत.
Ind vs Sa Live : नॅशनल अँथमसाठी दोन्ही संघ मैदानात
Ind vs Sa Live : नॅशनल अँथमसाठी दोन्ही संघ भारत आणि दक्षिण आफ्रिका मैदानात उतरले आहेत. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला असून भारत क्षेत्ररक्षणासाठी थोड्याच वेळात मैदानात उतरणार आहे.
Ind vs Sa Live : कशी आहे दक्षिण आफ्रिका संघाची प्लेईंग 11?
Ind vs Sa Live : दक्षिण आफ्रिका संघाची प्लेईंग 11 : एडन मार्करम (कर्णधार), क्विंटन डिकॉक (विकेटकिपर), रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, कगिसो रबाडा, लुंगी एनगिडी
Ind vs SA Live : कशी आहे भारताची प्लेईंग इलेव्हन?
Ind vs SA Live : भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. अक्षर पटेलच्या जागेवर वॉशिंग्टन सुंदर खेळणार असल्याचं कर्णधार सूर्यकुमार यादवनं स्पष्ट केलं आहे. अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकिपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरूण चक्रवर्ती
Ind vs SA Live : नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा फलंदाजीचा निर्णय
Ind vs Sa Live : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात सुपर 8 चा सामना थोड्याच वेळात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. तत्पूर्वी नाणेफेकीचा कौल मैदानात पार पडला. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
T20 World Cu0 2026 Live : सुपर 8 च्या आजच्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेला हरवलं
T20 World Cu0 2026 Live : दुसऱ्या सुपर 8 सामन्यात इंग्लंडने 51 धावांनी श्रीलंकेचा पराभव केला. श्रीलंकेपुढं 147 धावांचं लक्ष्य होतं. परंतु, इंग्लंडने फक्त 95 धावांवरच श्रीलंकेच्या सर्व फलंदाजांना गुंडाळलं.
IND vs SA Live : भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याची नाणेफेक किती वाजता?
IND vs SA Live : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात सुपर 8 चा दुसरा सामना थोड्याच वेळात नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. साडेसहा वाजता नाणेफेक होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींनी हजारोंच्या संख्येत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थिती दर्शवली आहे.