जाहिरात

T20 World Cup 2026, IND v SA: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात दोन सख्खे भाऊ आमनेसामने, "आमच्या आईला टेन्शन.."

एकीकडे भारत आणि आफ्रिका संघात रंगतदार लढत होणार आहे. तर दुसरीकडे दोन सख्खे भाऊही एकमेकांच्या विरोधात रणनीती आखताना दिसणार आहे.

T20 World Cup 2026, IND v SA: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात दोन सख्खे भाऊ आमनेसामने, "आमच्या आईला टेन्शन.."
india vs south africa match update today

Albie Morkel vs Morne Morkel: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 वर्ल्डकप 2026 चा सुपर 8 चा दुसरा सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. एकीकडे भारत आणि आफ्रिका संघात रंगतदार लढत होणार आहे. तर दुसरीकडे दोन सख्खे भाऊही एकमेकांच्या विरोधात रणनीती आखताना दिसणार आहे. या सामन्यात दोन भाऊ मोर्ने मोर्केल आणि एल्बी मोर्केल आमनेसामने उतरणार आहे. मोर्ने मोर्केल भारतीय क्रिकेट संघाचे गोंलादाजी प्रशिक्षक आहेत. तर एल्बी मोर्केल दक्षिण आफ्रिका संघासाठी स्पेशलिस्ट कंसल्टेंट म्हणून काम पाहत आहेत. 

जेव्हा भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ एकमेकांविरोधात मैदानात उतरतील. तेव्हा डग आऊट मध्ये दोन सख्खे भाऊ आपापल्या टीमसाठी रणनीती आखतील. बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका आणि भारत  सामन्यापूर्वी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दोन्ही भाऊ आपापल्या टीमबाबत चर्चा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

मोर्ने मोर्केल

मोर्ने मोर्केल यांनी त्यांच्या टेस्ट करिअरमध्ये 86 सामने,117 वनडे आणि 44 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन खेळले आहेत. मोर्ने मोर्केलने आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये एकूण 544 धावा केल्या आहेत. मोर्ने मोर्केल गोलंदाजी प्रशिक्षक आहेत आणि गौतम गंभीर यांच्या कोचिंग स्टाफचा महत्त्वाचा भाग आहेत. या सामन्यात ते दक्षिण आफ्रिकेचा पराभव करण्यासाठी वेगळ्या रणनीतीसोबत तयार असल्याचं पाहायला मिळतील. 

नक्की वाचा >> Shocking News: चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलांवर अत्याचार, पीडितांनी पालकांना सर्वकाही सांगितलं अन्..

एल्बी मोर्केल

एल्बी मोर्केलने त्यांच्या करिअरमध्ये एक टेस्ट मॅच, 58 वनडे आणि 50 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एल्बी मोर्केलने त्यांच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये 1412 धावा आणि एकूण 77 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.एल्बी मोर्केल यांनी यापूर्वी आयपीएलमध्ये सीएसकेसाठी काम केलं आहे. एल्बी यांच्याकडे टी-20 क्रिकेटच्या रणनीतीबाबत दांडगा अनुभव आहे. त्यांनी सीएसकेसाठी कोच स्टीफन फ्लेमिंग यांच्यासोबत काम केलं आहे.

बीसीसीआयने शेअर केली पोस्ट

बीसीसीआयने शेअर केलेल्या पोस्टमध्ये दोन्ही भाऊ एकमेकांसोब चर्चा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी सामन्याबाबत चर्चा केली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. "आमची आई जास्त टेन्शनमध्ये आहे, कारण कोणत्या टीमला सपोर्ट करायचं, हेच तिला समजत नाहीय",असं त्यांनी म्हटलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com