ACC Mens Asia Cup Rising Stars 2025: कतारची राजधानी दोहामध्ये सुरू असलेल्या ACC Mens Asia Cup Rising Stars 2025 स्पर्धेच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये (BANA vs INDA 1st Semi-Final ) अनेक स्टार्सचा समावेश असलेल्या भारत 'ए' टीमचा धक्कादायक पराभव झाला. दुबळ्या बांगलादेशनं भारतीय टीमला पराभूत करत खळबळ उडवून दिली. हा रोमांचक सामना सुरुवातीला टाय झाला, पण सुपर ओव्हरमधील एका वादग्रस्त निर्णयामुळे भारताने सामना गमावला आणि ही 'सुपर मिस्टेक' आता क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.
कसा झाला सामना?
सेमीफायनलच्या या सामन्यात, टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करणाऱ्या बांग्लादेश 'ए' संघाने त्यांच्या निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट्स गमावत 194 रन केले. या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना, एका वेळी चांगली स्थिती असूनही, भारत 'ए' संघानेही त्यांच्या 20 ओव्हर्समध्ये तेवढ्याच 6 विकेट्स गमावत बरोबर 194 रन केले. त्यामुळे सामना 'टाय' झाला आणि विजेत्याचा निर्णय सुपर ओव्हरने घेण्याची वेळ आली.
( नक्की वाचा : IPL 2026 Auction : तुमच्या आवडत्या टीमने कोणाला ठेवलं? पाहा रिलीज केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी, एका क्लिकवर )
सुपर ओव्हरमध्ये काय घडलं?
नियमांनुसार, सुपर ओव्हरमध्ये बॅटिंगसाठी आलेल्या भारत 'ए' टीमची सुरुवात खूपच खराब झाली. कॅप्टन जितेश शर्मा याने पहिल्याच यॉर्कर बॉलवर रिव्हर्स लॅप शॉट खेळण्याचा अनावश्यक प्रयत्न केला आणि तो बोल्ड झाला. त्यानंतर, नवा बॅटर आशुतोष शर्मा पुढच्याच बॉलवर एक्स्ट्रा-कव्हरला कॅच देऊन आऊट झाला. विशेष म्हणजे, अवघ्या दोन बॉलमध्ये भारतीय टीमची सुपर ओव्हरमधील इनिंग 0 (शून्य) रनवर संपली!
सुपर ओव्हरमध्ये जितेश शर्मा आणि मॅचच्या इनिंगमध्ये नंबर-6 वर येऊन 11 बॉलमध्ये 17 रन करणारा रमनदीप फलंदाजीसाठी आले, तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कॉमेंट्री बॉक्सपासून ते फॅन्सपर्यंत, सगळीकडे या निर्णयावर जोरदार चर्चा सुरू झाली.
... त्या चुकीनं सारं संपलं
ज्या बॅटरने पहिल्या इनिंगमध्ये 2 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने सर्वाधिक 38 रन केले आणि ज्याने पहिल्याच ओव्हरमध्ये सिक्स मारून 19 रन काढले होते, त्या वैभव सूर्यवंशीला सुपर ओव्हरमध्ये ओपनिंगसाठी का नाही पाठवले?" हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
खरं तर, वैभवला सुपर ओव्हरमध्ये न पाठवणे हीच भारतीय टीम मॅनेजमेंट आणि कोच सुनील जोशी यांची 'सुपर मिस्टेक' ठरली. या एका चुकीच्या निर्णयामुळे भारताने सेमीफायनलसारखा महत्त्वाचा सामना गमावला आणि स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.