IPL 2026 Released Players List: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या महालिलावापूर्वी सर्व फ्रँचायझींनी आपल्या टीममध्ये मोठे बदल केले आहेत. खेळाडूंची रिटेन (Retain) आणि रिलीज (Release) करण्याची यादी आता जाहीर झाली आहे, ज्यामुळे आगामी लिलावासाठी (Auction) रंगत वाढली आहे. गेल्या सिझनच्या लिलावातील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक असलेल्या वेंकटेश अय्यरला कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मुक्त केले आहे, तर दुसऱ्या बाजूला, चेन्नई सुपर किंग्जने (CSK) सर्वाधिक खेळाडूंना रिलीज करून मोठा फेरबदल करण्याची तयारी दर्शवली आहे. लिलावामध्ये 64.3 कोटी रुपये इतक्या मोठ्या पर्ससोबत कोलकाता नाईट रायडर्स (KKR) सर्वात श्रीमंत संघ म्हणून उतरणार आहे.
फ्रँचायझीनुसार रिलीज झालेल्या खेळाडूंची सविस्तर माहिती
आयपीएल 2026 साठी 16 डिसेंबर रोजी होणाऱ्या लिलावामध्ये कोणकोणत्या खेळाडूंवर बोली लागणार, हे निश्चित झाले आहे. पाहूया ही संपूर्ण यादी
कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)
मुक्त केलेले खेळाडू: कोलकाताने आपल्या संघातून आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, क्विंटन डी कॉक, मोईन अली आणि एनरिक नॉर्खिया यांसारख्या मोठ्या नावांना रिलीज केले आहे. याशिवाय गुरबाज, स्पेन्सर जॉन्सन, चेतन सकारिया आणि लवनीथ सिसोदिया यांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
लिलावासाठी पर्स (Purse): KKR कडे लिलावासाठी 64.3 कोटी रुपये इतकी सर्वाधिक रक्कम उपलब्ध आहे.
चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings)
मुक्त केलेले खेळाडू: चेन्नई सुपर किंग्जने सर्वाधिक खेळाडूंना रिलीज केले आहे. त्यात मथीशा पथीराना, डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, विजय शंकर, शेख रशीद, आंद्रे सिद्धार्थ, कमलेश नागरकोटी आणि वंश बेदी यांचा समावेश आहे.
लिलावासाठी पर्स (Purse): CSK कडे लिलावासाठी 43.4 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम शिल्लक आहे.
( नक्की वाचा : IPL 2026 Trade : CSK नं सर जडेजाला सोडून संजू सॅमसनला का घेतलं? ही आहे खरी Inside Story )
लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants)
मुक्त केलेले खेळाडू: लखनऊ संघाने आर्यन जुयल, डेव्हिड मिलर, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, शार्दुल ठाकूर, आकाश दीप, रवी बिश्नोई आणि शमर जोसेफ या खेळाडूंना रिलीज केले आहे.
लिलावासाठी पर्स (Purse): LSG कडे लिलावासाठी 22.95 कोटी रुपये इतकी रक्कम शिल्लक आहे.
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)
मुक्त केलेले खेळाडू: दिल्ली कॅपिटल्सने जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, डोनावन फरेरा, सेदिकुल्लाह अटल, मानवंत कुमार, दर्शन नालकंडे आणि मोहित शर्मा यांना रिलीज केले आहे.
लिलावासाठी पर्स (Purse): दिल्ली कॅपिटल्सकडे लिलावासाठी 21.8 कोटी रुपये शिल्लक आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (Royal Challengers Bengaluru)
मुक्त केलेले खेळाडू: आरसीबीने लियाम लिव्हिंगस्टोन यांना रिलीज केले आहे. लुंगी एनगिडी हे राखीव खेळाडूंच्या यादीत होते आणि त्यांनाही संघाने मुक्त केले आहे. तसेच, जखमी देवदत्त पडिक्कलच्या जागी संघात घेतलेले मयंक अग्रवाल आणि एकही सामना न खेळलेला स्वास्तिक चिकारा यांनाही रिलीज करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आरसीबीने यश दयालला मात्र संघात कायम ठेवले आहे, ज्याने 3 जून रोजी आयपीएल फायनलनंतर कोणताही क्रिकेट सामना खेळलेला नाही.
लिलावासाठी पर्स (Purse): आरसीबीकडे लिलावासाठी 16.40 कोटी रुपये शिल्लक आहेत.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)
मुक्त केलेले खेळाडू: मुंबई इंडियन्सने आपल्या मुख्य खेळाडूंच्या गटाला कायम ठेवले आहे, परंतु त्यांनी बेनव्ह जेकब्स, के. श्रीजीथ, अर्जुन तेंडुलकर, विग्रेश पुथुर, कर्ण शर्मा, लिझाद विल्यम्स, सत्यनारायण राजू, मुजीब उर रहमान आणि रीस टॉपले या 9 खेळाडूंना रिलीज केले आहे.
लिलावासाठी पर्स (Purse): मुंबई इंडियन्सकडे लिलावासाठी केवळ 2.75 कोटी रुपये शिल्लक आहेत.
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)
मुक्त केलेले खेळाडू: राजस्थानने कुणाल राठोड, नीतीश कुमार राणा, वनिंदू हसरंगा, अशोक शर्मा, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, महीश तीक्षणा आणि फझलहक फारुकी यांना रिलीज केले आहे.
लिलावासाठी पर्स (Purse): राजस्थान रॉयल्सकडे लिलावासाठी 16.05 कोटी रुपये शिल्लक आहेत.
सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)
मुक्त केलेले खेळाडू: हैदराबादने अभिनव मनोहर, अथर्व तारे, सचिन बेबी, विलन मुल्डर, मोहम्मद शमी, सिमरजीत सिंग, राहुल चहर आणि ॲडम झाम्पा यांना रिलीज केले आहे.
लिलावासाठी पर्स (Purse): सनरायझर्स हैदराबादकडं लिलावासाठी 25.50 कोटी रुपये शिल्लक आहेत.
गुजरात टायटन्स (Gujarat Titans)
मुक्त केलेले खेळाडू: गुजरात संघाने बेवन जेकब्स, कर्ण शर्मा, केएल सृजित, लिझार्ड विल्यम्स, मुजीब उर रहमान, पीएसएन राजू, रीस टॉपले आणि विग्नेश पुथुर यांना रिलीज केले आहे.
लिलावासाठी पर्स (Purse): गुजरात टायटन्सकडं लिलावासाठी 12.90 कोटी रुपये शिल्लक आहेत.
पंजाब किंग्ज (Punjab Kings)
मुक्त केलेले खेळाडू: पंजाब किंग्जने ग्लेन मॅक्सवेल, जॉश इंग्लिस, ॲरॉन हार्डी, काइल जेमिसन, कुलदीप सेन आणि प्रवीण दुबे या खेळाडूंना रिलीज केले आहे.
लिलावासाठी पर्स (Purse): पंजाब किंग्जकडं लिलावासाठी 11.50 कोटी रुपये शिल्लक आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world