Shreyas Iyer :'त्याची काही चूक नाही,आमचीही नाही' श्रेयस अय्यरचा समावेश न होण्याचं अजित आगरकरनं सांगितलं कारण

India Squad For Asia Cup 2025 : आशिया कप 2025 साठी टीम इंडियाची घोषणा मंगळवारी (19 ऑगस्ट) करण्यात आली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Shreyas Iyer : श्रेयस अय्यरला चांगल्या कामगिरीनंतरही निराश व्हावं लागलं आहे.
मुंबई:

India Squad For Asia Cup 2025 : आशिया कप 2025 साठी टीम इंडियाची घोषणा मंगळवारी (19 ऑगस्ट) करण्यात आली. टीमचा कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन टीम जाहीर केली. शहरात मुसळधार पाऊस सुरू असतानाही ही पत्रकार परिषद झाली आणि टीम इंडियाची घोषणा करण्यात आली.

पहिल्याच टेस्ट सीरिजमध्ये कॅप्टन म्हणून दमदार कामगिरी करणाऱ्या शुबमन गिलची टीममधील निवड अनिश्चित होती. पण, गिललं टीममध्ये स्थानच नाही तर व्हाईस कॅप्टन करण्यात आलं आहे. गिलनं शेवटचा T20 सामना 2024 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पल्लेकेलेमध्ये खेळला होता. आता त्याने अक्षर पटेलची जागा घेऊन सूर्यकुमार यादवचा व्हाईस कॅप्टन म्हणून पदभार स्वीकारला आहे.

या निवडीबद्दल बोलताना, निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर म्हणाले, "इंग्लंडमधील गिलच्या कामगिरीची आम्हाला अपेक्षा होती, पण त्याने त्याहूनही चांगली कामगिरी करून ती अपेक्षा पूर्ण केली."

( नक्की वाचा : Asia Cup 2025 :आशिया कपसाठी टीम इंडिया जाहीर, 2 बड्या खेळाडूंचं कमबॅक, 3 जणांची निराशा ! )
 

श्रेयस अय्यर का बाहेर?

शुबमन गिलचा टीममध्ये समावेश झाल्यानं श्रेयस अय्यरचा मार्ग बंद झाला. श्रेयस मजबूत दावेदार होता. PL 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला विजेतेपद मिळवून दिल्यानंतर आणि 2025 मध्ये पंजाब किंग्जला अंतिम फेरीत घेऊन गेल्यामुळे अय्यरने त्याच्या उत्कृष्ट कॅप्टनसीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

Advertisement

अय्यरला वगळण्याबद्दल बोलताना आगरकर म्हणाला, "यशस्वी जयस्वालसाठी हे खूप दुर्दैवी आहे. अभिषेक चांगला खेळत आहे आणि तो बॉलिंगही करू शकतो.या दोघांपैकी एक जण बाहेर राहणारच होता. श्रेयसच्या बाबतीतही असेच झाले, त्यात त्याची काहीही चूक नाही."

"श्रेयस अय्यरच्या जागी दुसऱ्या कोणाची निवड करायची? यात त्याची चूक नाही, पण आमचीही नाही." असं आगरकरनं स्पष्ट केलं.

कसा आहे श्रेयसचा फॉर्म?

या वर्षी वन-डे क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरनं दमदार कामगिरी केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या विजेतेपद विजयात तो भारताकडून सर्वाधिक रन्स करणारा आणि एकूण दुसरा सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू ठरला. त्याने 5 सामन्यांमध्ये 48.60 च्या सरासरीने 243 रन्स केले होते. ज्यात 2 हाफ सेंच्युरींचा समावेश होता. त्याचा सर्वोत्तम स्कोअर 79 होता.

Advertisement

अय्यर व्यतिरिक्त, बुमराहच्या उपलब्धतेबद्दलही काही शंका होत्या, कारण ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या टेस्ट सीरिजमुळे तो उपलब्ध होईल की नाही, याची खात्री नव्हती. पण निवड समितीने त्याचा टीममध्ये समावेश केला आहे. गेल्या वर्षी झालेल्या T20 वर्ल्ड कपनंतर बुमराह पहिल्यांदाच भारताकडून T20 खेळणार आहे.

आशिया चषकसाठी टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कॅप्टन), शुभमन गिल (व्हाईस कॅप्टन),अभिषेक शर्मा,हार्दिक पांड्या,अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, जितेश शर्मा, शिवम दुबे, अर्शदीप सिंग, संजू सॅमसन, हर्षित राणा, तिलक वर्मा, रिंकू सिंह आणि वरुण चक्रवर्ती.

Advertisement


 

Topics mentioned in this article