IND vs ENG : पहिल्या टेस्टमधील पराभवानंतर टीम इंडियात बदल, 'या' खेळाडूची हकालपट्टी

India vs England Test Series : लीड्स टेस्टमधील पराभवानंतर टीम इंडियात एक बदल झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
India vs England Test Series : निराशाजनक सुरुवातीनंतर टीम इंडियात एक बदल झाला आहे.
मुंबई:

India vs England Test Series : शुबमन गिलच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात लीड्समध्ये झालेली पहिली टेस्ट टीम इंडियानं 5 विकेट्सनं गमावली. लीड्स टेस्टमध्ये भारतीय बॅटर्सनी दमदार कामगिरी केली. भारताकडून या टेस्टमध्ये चार जणांनी पाच सेंच्युरी केल्या. त्यानंतरही टीम इंडियाला पराभव टाळता आला नाही. यजमान टीमनं शेवटच्या दिवशी 371 रन्सचं आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

टीम इंडियात बदल

लीड्स टेस्टमधील पराभवानंतर टीम इंडियात एक बदल झाला आहे. भारतीय टीममधील फास्ट बॉलरला हर्षित राणाला टीममधून मुक्त करण्यात आलं आहे. हर्षितचा इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या मुळ टीममध्ये समावेश नव्हता. पण, लीड्स टेस्टसाठी त्याचा कव्हर म्हणून समावेश करण्यात आला होता. 

हर्षित राणाने यापूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजमध्ये दोन टेस्ट खेळल्या. तिथं त्याची कामगिरी सामान्य होती. तसंच तो इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारत 'अ' टीमचाही सदस्य होता. या सीरिजमध्येही तो चांगली कामगिरी करु शकला नाही. कँटरबरी येथे इंग्लंड लायन्सविरुद्धच्या अनधिकृत टेस्टमध्ये त्यानं 27 ओव्हर्समधील 99 रन्स देऊन फक्त 1 विकेट घेतली होती. 

( नक्की वाचा : IND vs ENG : U19 टीमनं घेतला बदला, 50 ओव्हरमध्ये ठोकले 442 रन्स! ट्रक ड्रायव्हरच्या मुलाची वादळी सेंच्युरी )
 

हर्षितला टीममधून वगळण्यात आलं आहे. तो चार जुलैपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या टेस्टसाठी बर्मिंगहॅमला गेलेला नाही, अशी माहिती बीसीसीआयच्या सुत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला  दिली.  

Advertisement

लीड्स टेस्टनंतर टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरनं याबाबतचे संकेत दिले होते. 'हर्षित राणाबद्दल मी निवड समितीच्या अध्यक्षांशी चर्चा करेन. त्याचा काही दुखापतींमुळे टीममध्ये समावेश करण्यात आला होता. आता सर्व काही ठीक आहे. मी चर्चा करेन आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ,' असं गंभीर म्हणाला होता. 
 

Topics mentioned in this article