India Pakistan News : आताची मोठी बातमी; IPL 2025 स्थगित, BCCI चा मोठा निर्णय

सुरक्षिततेचा विचार करता बीसीसीआयने आयपीएल 2025 चे पुढील सामने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min

भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावादरम्यान आयपीएल 2025 स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल गुरुवारी हिमाचल प्रदेशच्या धर्मशाला स्टेडियममध्ये पंजाब आणि दिल्ली यांच्या सुरु असलेला सामना रद्द करण्यात आला होता. 10.1 षटकांचा खेळ झाला असताना हा सामना रद्द करण्यात आला होता. मात्र सुरक्षिततेचा विचार करता बीसीसीआयने आयपीएल 2025 चे पुढील सामने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

खेळाडू आणि प्रेक्षकांची सुरक्षा पाहता बीसीसीआयकडून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. सध्या भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर ड्रोन हल्ले केले जात आहेत. येत्या काही दिवसात भारत पाकिस्तानमधील संघर्ष वाढण्याची भीती आहे.

त्यामुळे नागरिकांची आणि खेळाळूंच्या सुरक्षेसाठी आयपीएल 2025 स्थगित करण्यात आलं आहे. अद्यापही आयपीएलचे १५ सामने शिल्लक आहेत. हे सामने कधी होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती कळू शकलेली नाही.