भारतीय क्रिकेटपटू सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामात व्यस्त आहेत. मे महिन्याच्या अखेरीस आयपीएलचा सतरावा हंगाम संपुष्टात आल्यानंतर जून महिन्यात लगेचच भारतासमोर टी-20 वर्ल्डकपंच आव्हान असणार आहे. मागच्याच वर्षी भारतीय संघाने घरच्या मैदानावर खेळत असताना वन-डे विश्वचषक हातातून गमावला होता. त्यामुळे टी-20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माच्या भारतीय संघाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.
परंतु या स्पर्धेला सुरुवात होण्याआधी IPL मध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कोच आणि न्यूझीलंडचा माजी कॅप्टन स्टिफन फ्लेमिंगने टीम इंडियाला महत्वाचा सल्ला दिला आहे.
पहिले 'ही' गोष्ट नक्की करा - स्टिफन फ्लेमिंग
माझ्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा हा असेल की भारतीय संघ वर्ल्डकपमध्ये कशा प्रकारचा खेळ करायचा विचार करत आहे. भारतात खेळत असतानाची रणनिती आणि भारताबाहेर खेळत असतानाची रणनिती ही त्यांनी नक्की करणं गरजेचं आहे असं फ्लेमिंगने सांगितलं. तो मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्याआधी पत्रकार परिषदेत बोलत होता.
खेळाडूंची निवड करतानाही लक्ष द्या ! -
यापुढे बोलताना फ्लेमिंगने खेळाची रणनिती नक्की केल्यानंतर त्यानुसार खेळाडूंना संघात स्थान मिळायला हवं असं सांगितलं. निवडायचे आहेत म्हणून खेळाडू निवडण्यात काहीच अर्थ नसल्याचंही फ्लेमिंग म्हणाला. जे खेळाडू सध्या फॉर्मात आहेत आणि उपलब्ध परिस्थितीत चांगला खेळ करु शकतात अशांना संधी देण्याचं मतही फ्लेमिंगने व्यक्त केलं.
भारतीय संघाच्या निवड समितीचा प्रमुख असणं ही खडतर बाब -
भारतीय संघाच्या निवड समितीचं प्रमुख असणं हा जगातला सर्वात खडतर जॉब आहे असंही फ्लेमिंगने सांगितलं. यंदाचा टी-20 वर्ल्डकप हा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत संयुक्तरित्या खेळवला जाणार आहे.
अवश्य वाचा - धोनीला पाहण्यासाठी खरेदी केलं 64 हजार रुपयांचं तिकीट, मुलींची फी देखील भरली नाही