India Tour of England : शुबमन गिल नाही तर 'या' खेळाडूला टीम इंडियाचा कॅप्टन करा, गावस्करांचा सल्ला

Sunil Gavaskar big Statement on India Next Test Captain: . रोहितच्या निवृत्तीनंतर या भारतीय टीमचा कॅप्टन म्हणून शुबमन गिलचं (Shubman Gill) नाव चर्चेत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Sunil Gavaskar big Statement on India Next Test Captain: रोहित शर्मा (Rohit Shrama) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीमुळे टीम इंडियामध्ये आता बदलाचं युग सुरु झालं आहे. भारतीय टीम आयपीएलनंतर 5 टेस्टच्या सीरिजसाठी इंग्लंड दौऱ्यावर जात आहे. दोन्ही देशांमधील टेस्ट सीरिजला 20 जूनपासून लीड्समध्ये सुरुवात होत आहे. रोहितच्या निवृत्तीनंतर या भारतीय टीमचा कॅप्टन म्हणून शुबमन गिलचं (Shubman Gill) नाव चर्चेत आहे. पण, महान क्रिकेटपटू सुनील गावस्करांचं मत वेगळं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भारतीय टेस्ट टीमचा कॅप्टन म्हणून जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) निवड करण्यात यावी असं मत गावस्कर यांनी 'स्पोर्ट्स टुडे' शी बोलताना सांगितलं. बुमराहवरील वर्कलोडचा मुद्दा देखील गावस्करांनी फेटाळला. 

Advertisement

गावस्कर यावेळी म्हणाले की, 'त्याचं काम काय आहे, बुमराहपेक्षा जास्त कुणाला समजू शकेल. माझ्यामते जसप्रीत बुमराहला कॅप्टन करण्यात यावं. त्याच्या वर्कलोडच्या प्रेशरची मला माहिती आहे. पण, त्याला ही जबाबदारी दिल्यावर किती ओव्हर बॉलिंग करायची आहे, कधी स्वत:ला आराम द्यायचा आहे, हे सर्व समजू शकेल, ही सर्वात चांगली गोष्ट असेल.'

Advertisement

Advertisement

( नक्की वाचा :  Rohit Sharma : रोहित शर्माचा इंग्लंड दौऱ्यापूर्वी मोठा निर्णय, टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा )

सुनील गावस्कर पुढे म्हणाले की, "बुमराहवर कदाचित टेस्ट मॅच न खेळण्याची वेळ देखील येणार नाही. त्याला कॅप्टनसी दिली तर स्वत:चे शरीर खराब होण्यापूर्वी कधी थांबायचे आहे, हे त्याला कळेल.   माझ्या मते, त्याला ही जबाबदारी सोपवली जावी. पहिल्या टेस्टनंतर आठ दिवसांचा ब्रेक आहे, ज्यामुळे त्याला ठीक आणि तंदुरुस्त होण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. त्यानंतर लगेच दोन टेस्ट मॅच आहेत.  जे व्यवस्थित हाताळले जाऊ शकतात. यानंतर आणखी एक ब्रेक देखील आहे. तो कॅप्टन असेल, तर तो त्याच्या कामाचा ताण चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकेल. '

कसा आहे अनुभव?

बुमराहला आत्तापर्यंत 3 टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाची कॅप्टनसी करण्याचा अनुभव आहे. त्यानं 2022 साली इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहममध्ये झालेल्या टेस्टमध्ये सर्वप्रथम कॅप्टनसी केली होती. त्यानंतर 2024-25 मधील बॉर्डर-गावस्कर सीरिजमध्येही त्यानं कॅप्टनसी केली आहे. बुमराहच्या नेतृत्त्वाखालीच भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये टेस्ट जिंकली होती. त्यानंतर सिडनी टेस्टमध्ये तो कॅप्टन होता. 
 

Topics mentioned in this article