India Test Squad for ENG Tour : इंग्लंड दौऱ्यासाठी शमीची निवड का झाली नाही? आगरकरनं सांगितलं कारण

Mohammed Shami Ruled Out Of England Test Series:  दुखापतीनंतर भारतीय टीममध्ये पुनरागमन करणारा फास्ट बॉलर मोहम्मद शमीची (Mohammed Shami) या सीरिजसाठी निवड झालेली नाही

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Mohammed Shami Ruled Out Of England Test Series:  भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पाच टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची निवड झाली आहे. रोहित शर्मानं (Rohit Sharma) या प्रकारातून निवृत्ती घेतल्यानंतर शुबमन गिल (Shubman Gill) टीम इंडियाचा कॅप्टन आहे. तर ऋषभ पंत (Rishabh Pant) व्हाईस कॅप्टन असेल.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

या सीरिजसाठी काही तरुण खेळाडूंना टीममध्ये संधी मिळालीय. तर काही दिग्गज खेळाडूंचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. पण, दुखापतीनंतर भारतीय टीममध्ये पुनरागमन करणारा फास्ट बॉलर मोहम्मद शमीची (Mohammed Shami) या सीरिजसाठी निवड झालेली नाही. इंग्लंड सारख्या खडतर दौऱ्यात अनुभवी शमी का नाही? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल... आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देणार आहोत.

Advertisement

आगरकरनं सांगितलं कारण

निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरनं पत्रकार परिषदेमध्ये मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. मोहम्मद शमी पूर्णपणे फिट नसल्यानं त्याची टीममध्ये निवड झालेली नाही, असं आगरकरनं सांगितलं. आगामी सीरिजसाठी तो तंदुरुस्त होण्याचा प्रयत्न करत होता, पण गेल्या आठवड्यात त्याला काही अडचणी आल्या. त्यानंतर त्याने एमआरआय (MRI) करून घेतला. मला वाटत नाही की तो पाच सामन्यांची संपूर्ण सीरिज खेळू शकेल. तो काही सामन्यांसाठी उपलब्ध असेल अशी आम्हाला आशा होती. पण तो वेळेवर तंदुरुस्त होऊ शकला नाही, तर प्रतीक्षा करणे खूप कठीण होईल. आमच्यासाठी हे खूप दुर्दैवी आहे, कारण त्याच्यासारख्या बॉलरला निवडण्याची आम्हाला इच्छा होती, असं आगरकरनं सांगितलं. 

Advertisement

इंग्लंड दौऱ्यासाठी 18 सदस्यीय टीम इंडिया

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (व्हाईस कॅप्टन/विकेटकिपर), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव.

Advertisement


( नक्की वाचा : Team India Squad: टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! इंग्लड दौऱ्यासाठी संघाची घोषणा )