Sam Konstas, Australia vs India, 4th Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे टेस्टमध्ये सॅम कोन्टासनं इतिहास रचला आहे. तो ऑस्ट्रेलियाकडून टेस्ट क्रिकेट खेळणारा चौथा तरुण खेळाडू बनला आहे. सॅमनं आज (26 डिसेंबर, गुरुवार) टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी त्याचं 19 वर्ष 85 दिवस वय होतं. ऑस्ट्रेलियाकडून सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रम इयान क्रेगच्या नावावर आहे. त्यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1953 साली 17 वर्ष 239 दिवस वय असताना पदार्पण केलं होतं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पहिल्याच मॅचमध्ये दिला धक्का
पदार्पणाच्या टेस्टमध्येच सॅमनं बिनधास्त शैलीत बॅटींग केली. त्यानं ऑस्ट्रेलियाच्या इनिंगची सुरुवात करताना 65 बॉलचा सामना केला. त्यावेळी त्यानं वन-डे स्टाईल बॅटिंग करत 92.31 च्या स्ट्राईक रेटनं 60 रन काढले. या खेळीत त्यानं सहा फोर आणि दोन सिक्स लगावले.
( नक्की वाचा : IND vs AUS : विराट कोहलीला मोठा धक्का, ऑस्ट्रेलियन खेळाडूशी झालेल्या वादानंतर मिळाली शिक्षा )
बुमराहविरुद्ध रेकॉर्ड
कोन्टासनं त्याच्या खेळीत दिग्गज बॉलर जसप्रीत बुमराहला लक्ष्य केलं. त्यानं बुमराहाच्या बॉलिंगवर दोन सिक्स लगावले. पदार्पणाच्या टेस्टमध्येच बुमराहविरुद्ध दोन सिक्स लगावणारा तो जगातील एकमेव बॅटर आहे. त्याचबरबोर कोन्टासनं 2021 नंतर टेस्ट क्रिकेटमध्ये बुमराहच्या बॉलिंगवर सिक्स लगावला आहे. मागील तीन वर्षांत एकाही बॅटरला बुमराहच्या बॉलिंगवर सिक्स मारता आला नव्हता.
कोण आहे कोन्टास?
सॅम कोन्टासचा जन्म 2 ऑक्टोबर 2005 या दिवशी ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये झाला. तो ग्रीक वंशाचा ऑस्ट्रेलियन आहे. तो उजव्या हातानं बॅटींग तसंच उजव्या हातानंच ऑफब्रेक बॉलिंग करतो.
त्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी 11 फर्स्ट क्लास, 1 लिस्ट ए आणि 2 T20 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्यानं फर्स्ट क्लास क्रिकेटमधील 18 इनिंगमध्ये 42.23 च्या सरासरीनं 718 रन केले आहेत. लिस्ट A मधील एका इनिंगमध्ये 10.00 च्या सरासरीनं 10 आणि दोन टी20 इनिंगमध्ये 28 च्या सरासरीनं 56 रन केले. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर दोन सेंच्युरी आणि तीन हाफ सेंच्युरी आहेत. तर टी20 क्रिकेटमध्ये एक हाफ सेंच्युरी लगावलीय.