जाहिरात

IND vs AUS : विराट कोहलीला मोठा धक्का, ऑस्ट्रेलियन खेळाडूशी झालेल्या वादानंतर मिळाली शिक्षा

Virat Kohli Fined for Hitting Sam Constance IND vs AUS: मेलबर्नच्या MCG मैदानावर सुरु असलेल्या मॅचमधील पहिला दिवस वादामुळे गाजला. 

IND vs AUS : विराट कोहलीला मोठा धक्का, ऑस्ट्रेलियन खेळाडूशी झालेल्या वादानंतर मिळाली शिक्षा
मुंबई:

Virat Kohli Fined for Hitting Sam Constance IND vs AUS:  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील बॉक्सिंग डे (Boxing Day Test) टेस्टला सुुरुवात झाली आहे. मेलबर्नच्या MCG मैदानावर सुरु असलेल्या मॅचमधील पहिला दिवस वादामुळे गाजला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

या टेस्टमध्ये पदार्पण करणारा ऑस्ट्रेलियन ओपनर सॅम कोन्टास (Sam Konstas ) आणि विराट कोहलीचा (Virat Kohli) वाद झाला. या प्रकरणात विराटवर कारवाई करण्यात आलीय. 'क्रिकबझ'मनं दिलेल्या वृत्तानुसार या वादावादीनंतर विराटच्या मॅच फिसमधील 20 टक्के रक्कम कापण्यात आली आहे. त्याचबरोबर त्याला एक डिमेरिट पॉईंट मिळालाय. 


नेमकं काय घडलं?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी हा प्रकार घडला. या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियचा कॅप्टन पॅट कमिनन्सनं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पदार्पण करणारा सॅम कोन्टास आणि अनुभवी उस्मान ख्वाज यांनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करुन दिली. या दोघांमध्ये कोन्टास चांगलाच आक्रमक होता. त्यानं चक्क बुमराहला सिक्सरही लगावला.

( नक्की वाचा : Year Ender 2024 : T20 वर्ल्ड कप विजेतेपद ते अश्विनची रिटायरमेंट, कसं गेलं भारतीय क्रिकेटसाठी वर्ष? )
 

ऑस्ट्रेलियन इनिंगमधील 10 व्या ओव्हरमध्ये विराट कोहलीच्या हातामध्ये बॉल होता. पण, त्यावेळी असं वाटत होतं की विराटनं त्याचा रस्ता बदलला आणि त्याचा खांदा कोन्टासच्या खांद्याला धडकला. विराटला ते आवडलं नाही. त्यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. कोन्टासचा सहकारी उस्मान ख्वाजा आणि अंपायर मायकल गॉफनं तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती शांत केली. 

काय म्हणाला कोन्टास?

ड्रिंक्स ब्रेकच्या दरम्यान विराट कोहलीसोबत झालेल्या धडकेबाबत सॅम कोन्टासला प्रश्न विचारला. त्यावर कोन्टासनं फॉक्स स्पोर्ट्सला सांगितलं की. 'मैदानात जे काही होतं ते मैदानावरच राहतं. मला स्पर्धात्मक क्रिकेट आवडतं. या खचाखच भरलेल्या स्टेडियमवर पदार्पण करण्यासापेक्षा चांगलं काही असू शकत नाही. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com