IND vs AUS : गंभीरच्या लाडक्या शिष्यानं केली 'डोकेदुखी' दूर, भन्नाट बॉलवर मिळाली मोठी विकेट, Video

India vs Australia 1st Test : संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष असलेली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरु झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
India vs Australia 1st Test
मुंबई:

India vs Australia 1st Test : संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष असलेली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरु झाली आहे. पाच टेस्टच्या या सीरिजमधील पहिली टेस्ट आजपासून (22 नोव्हेंबर) पर्थमध्ये सुरु झाली आहे. या टेस्टमध्ये टीम इंडियाकडून ऑलराऊंडर नितीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) आणि फास्ट बॉलर हर्षित राणा (Harshit Rana) यांनी पदार्पण केलं.

नितीश रेड्डी आणि हर्षित राणा या दोघांनीही आयपीएल 2024 मध्ये दमदार कामगिरी करत टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरला प्रभावित केलं होतं. या कामगिरीच्या जोरावरच त्यांना पर्थ टेस्टमध्ये सीनिअर खेळाडूंना बाजूला करत पदार्पणाची संधी गंभीरनं दिली. 

नितीश रेड्डीनं पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक 41 रन केले. आठव्या क्रमांकाला बॅटिंगला आलेल्या नितीशनं 87 बॉलमध्ये ही खेळी करत टीम इंडियाला 150 पर्यंत पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

( नक्की वाचा : IND vs AUS : पहिल्याच टेस्टमध्ये टीम इंडियासोबत धोका, राहुलला वादग्रस्त पद्धतीनं दिलं आऊट, Video )

राणा चमकला

रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये भारतीय टीमची कॅप्टनसी करणाऱ्या जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) टीम इंडियाला दमदार सुरुवात करुन दिली. त्यानं पहिल्याच स्पेलमध्ये 3 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू स्टीव्ह स्मिथला त्यानं पहिल्याच बॉलवर आऊट केलं. स्मिथला खातंही उघडता आलं नाही.

Advertisement

बुमराहनं दमदार सुरुवात केल्यानंतर त्याचा फायदा अन्य बॉलर्सला झाला. या टेस्टमध्ये पदार्पण करणाऱ्या हर्षित राणानं टीम इंडियाला मोठी विकेट मिळवून दिली. राणानं टीम इंडियासाठी नेहमी डोकेदुखी  ठरणाऱ्या ट्रॅव्हिस हेडला 11 रनवर आऊट केला. राणानं टाकलेला बॉल कसा खेळायाचा हे हेडला समजलचं नाही. त्या गडबडीत त्याची दांडी उडाली.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये हेडनं 163 रन काढले होते. हेडच्या या सेंच्युरीमुळेच टीम इंडियाचा फायनलमध्ये पराभव झाला होता. त्यानंतरही हेडनं भारतीय बॉलर्लसा त्रास दिला आहे. पण, गौतम गंभीरचा लाडका शिष्य असलेल्या हर्षितनं त्याला स्वस्तात आऊट करत टीम इंडियाची एक मोठी डोकेदुखी दूर केली. 
 

Advertisement