ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या फास्ट बॉलर्सच्या मर्यादा दुसऱ्या टेस्टमध्ये उघड झाल्या. जसप्रीत बुमराहला खंबीर साथ देण्यात मोहम्मद सिराज आणि हर्षित राणा अपयशी ठरले. अॅडलेड टेस्टमधील टीम इंडियाच्या पराभवात हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे. पिंक बॉल टेस्टमध्ये झालेल्या पराभवानंतर मोहम्मद शमीचा टीममध्ये समावेश करण्यात यावा ही मागणी करण्यात येत आहे. शमी ऑस्ट्रेलियात कधी येणार? हा प्रश्न टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला विचारण्यात आला होता. त्यावर रोहितनं स्पष्ट उत्तर दिलं नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनंतर रोहित आणि शमीमध्ये सर्व काही आलबेल नाही अशी चर्चा सुरु झाली आहे. शमीच्या फिटनेसबाबत दोघांनीही केलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यानं या चर्चांना बळ मिळालंय. न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिज दरम्यानही शमीच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या उपलब्धतेबाबत रोहितला प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी देखील हाच प्रकार घडला होता.
आपण पूर्णपणे फिट असल्याचा दावा मोहम्मद शमीनं केलाय. तर ऑस्ट्रेलिया सीरिजसाठी फास्ट बॉलर शंभर टक्के फिट नसल्याचं मत रोहितनं व्यक्त केलंय. रोहित आणि शमीमध्ये याबाबत वाद झाल्याचा धक्कादायक दावा 'दैनिक जागरण'नं दिलेल्या वृत्तात करण्यात आला आहे.
( नक्की वाचा : विनोद कांबळीची कारकिर्द सचिनसारखी बहरली का नाही? राहुल द्रविडनं सांगितलं होतं कारण, Video )
शमी आणि रोहितमध्ये झाला होता वाद?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बंगळुरुमध्ये झालेल्या टेस्टच्या दरम्यान शमीनं रोहित शर्माची भेट घेतली होती. या भेटीदरम्यानही रोहितनं शमीच्या फिटनेसबाबत केलेल्या वक्तव्यावरुन दोघांमध्ये वाद झाला होता, अशी माहिती या वृत्तामध्ये सूत्रांच्या आधारानं देण्यात आलीय.
अॅडलेड टेस्ट संपल्यानंतर रोहित शर्माला मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी शमीसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद नसले तरी त्याला टीममध्ये घेण्यास मॅनेजमेंट घाई करणार नसल्याचं रोहितनं स्पष्ट केलं होतं.
( नक्की वाचा : IND vs AUS Pink Ball Test : भर मैदानात संतापला सिराज, लबुशेनच्या दिशेनं बॉल फेकला, पाहा Video )
शमीचा धमाका
रोहित शर्माच्या अॅडलेडमधील वक्तव्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोहम्मद शमीनं मैदानात दमदार कामगिरी केली आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील सामन्यात बंगालकडून खेळताना शमीनं 17 बॉलमध्ये नाबाद 32 रन काढले. त्याचबरोबर नंतर संपूर्ण 4 ओव्हर बॉलिंग करत 25 रन देत 1 विकेट घेतली. शमीच्या या कामगिरीमुळे बंगालनं चंदीगडचा 3 रनननं पराभव करत मुश्ताक अली स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.